भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील धरसोनी गावात गुरुवारी रात्री भाजप महिला खासदाराच्या bjp mp  गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून खासदारांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. रंजीता कोली असे या महिला खासदाराचे नाव आहे. एका सामूहिक आरोग्य केंद्रांचं निरिक्षण करण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर खासदार रंजीता कोली bjp mp यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उपचारानंतर कोली या विश्रमगृहात गेल्या. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्यांनि सांगितले कि, हा हल्ला खूप भयानक होता. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. हल्ल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. पोलिसांना संपर्क केला पण ४५ मिनिटांनी पोलीस घटनास्थळी आले. तर भरतपूर जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार फोन केल्यानंतरही त्यांनी फोन उचलला नाही.

कोरोना चाचणी कमी होत असल्यानं पत्र लिहिलं होतं.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना तीन दिवसापूर्वी खासदार रंजीता कोली यांनी पत्र लिहिलं होतं. भरतपूर मतदारसंघात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी होत असल्याचं त्यांनी म्हंटले होते. तसेच कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचे चाचण्या कमी झाल्याने आकलन होत नाही. दररोज किमान ५ हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. एवढेच नाही तर बाधितांची आकडेवारी लपवू नका असा टोलाही सरकारला त्यांनी लगावला होता.