आसाराम बापूचा अर्ज फेटाळला

जयपूर : वृत्तसंस्था – आसाराम बापू बालत्कारप्रकरणी तुरंगात आहे. पत्नी आजारी असल्याने आसाराम बापू यांनी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र गुरूवारी जोधपूर न्यायालयाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला.
येत्या गुरूवारी दिनांक २१ तारखेला जोधपूर न्यायालयात आसाराम बापूच्या अर्जावर सुनावणी झाली.न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने आसाराम बापूनां तुरुंगातच राहवे लागणार आहे. काही दिवसांपुर्वी आसाराम बापू यांच्या पत्नी लक्ष्मीदेवी यांना ह्रदयविकारचा झटका आला होता.सध्या अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आसाराम बापू यांनी जोधपूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केसा होता.
अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.जोधपूर न्यायालयाने आसाराम याचे सहकारी सेविका शिल्पी उर्फ संजिता गुप्ता, शरदचंद्र यांना दोषी ठरवले होते. या दोघांनाही प्रत्येकी २०-२० वर्षाच्या कारावासाची शिक्षा जोधपूर न्यायालयाने सुनावली आहे.याप्रकरणी इतर दोघे दोषी असल्याचा निकाल जोधपूर न्यायालयाने दिला होता.