वीजेच्या वायरला स्पर्श झाल्याने बस जळून खाक; 6 जण ठार तर 17 जण जखमी

जलोर (Jalore) (राजस्थान) : जलोर (Jalore) जिल्ह्यातील महेशपूर येथे वीजेच्या तारेचा संपर्कात आल्याने बसला आग लावून त्यात ६ जणांचा वीजेचा धक्का बसून जागीच मृत्यु झाला तर बसमधील १७ जण जखमी झाले आहेत.

 

 

 

 

 

महेशपूर येथील जिल्हा मुख्यालयाजवळ शनिवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली असल्याचे जलोरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी छगनलाल गोयल यांनी सांगितले आहे. ही बस बाडमेरहून ब्यावरकडे जात होती. बसचालक रस्ता चुकला व ग्रामीण भागात गेला. महेशपूर गावाजवळ बस एका वीजेच्या तारेला जाऊन धडकली. त्यात बसला आग लागली. बसचालक व कंडक्टर यांचा जागीच मृत्यु झाला. अन्य चार जणांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यु झाला. बसमधील जखमी १७ प्रवाशांवर जोधपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याचे गोयल यांनी सांगितले.