Rajewadi Chowk Pune Crime | पुणे : बोलत नसल्याच्या कारणावरुन प्रेयसीला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajewadi Chowk Pune Crime | किरकोळ वाद झाल्याने प्रेयसीने बोलणे बंद केले. याच रागातून प्रियकराने तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण केली. हा प्रकार राजेवाडी चौकात शुक्रवारी (दि.12) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणावर समर्थ पोलिसांनी (Samarth Police) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सेफ मेमण हुसेन मेमण (वय-29 रा. काशेवाडी चौकशी जवळ, पुणे) याच्यावर आयपीसी 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी लहानपणापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत.

दहा दिवसांपूर्वी आरोपी आणि फिर्यादी तरुणीसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीसोबत बोलणे बंद केले होते.
शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तरुणी राजेवाडी चौकात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेली होती.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. तु माझ्याशी का बोलत नाही, माझा फोन का उचलत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली.
तसेच हाताने तोंडावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी (PSI Manisha Giri) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार