‘थलायवा’ रजनीकांत यांची राजकारणात हटके ‘एन्ट्री’, म्हणाले – ‘मी CM बनणार नाही’

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – मी पक्षाचा नेता असेल आणि दुसरं कोणीतरी सीएम पदाचा दावेदार असेल. पक्ष आमच्याच सरकारला प्रश्न विचारेल. मी सीएम होणार नाही असं वक्तव्य साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. तमिळनाडूच्या राजधानीत घेतलेल्या प्रेस कॉन्फरंसमध्ये बोलताना रजीनाकांत यांनी राजकारणावर आणि नवीन पक्षाबद्दल भाष्य केलं.

‘मी मुख्यमंत्रीपदाचा विचार केलेला नाही’

पत्रकार परिषदेत बोलताना रजनीकांत म्हणाले, “मी मुख्यमंत्रीपदाचा विचार केलेला नाही. मला फक्त राजकारणात बदल हवा आहे. आपल्या राजकारणात दोन दिग्गज होते एक होत्या जयललिता आणि दुसरे होते कलैगनार. आता एक पोकळी जाणवते. जर सरकार आणि राजकारणात बदल झाला नाही तर परिस्थिती सुधारणार नाही.”

रजनीकांत पुढे म्हणाले, “गेल्या काही काळापासून मी तमिळनाडूचं राजकारण पहात आहे.” DMK आणि AIADMK चा उल्लेख करत ते म्हणाले, “लोकांना आता बदल हवा आहे. मला माझ्या पक्षात तरुण आणि शिक्षित असलेल्यांना संधी द्यायची आहे. मला तमिळनाडूमध्ये एक नवीन नेतृत्व पहायचं आहे.

रजनीकांत सुरू करणार नवा पक्ष ?

रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेण्याआधी असा अंदाज लावला जात होता की, लवकरच रजनीकांत एका नव्या पक्षाची घोषणा करू शकतात. पुढील राजकारणावर बोलताना ते म्हणाले, “मी असा पक्ष तयार करणार आहे ज्यात सरकार आणि पक्ष वेगवेगळं काम करेल.”

‘मी पक्षाचा नेता असेल आणि दुसरं कोणीतरी सीएम पदाचा दावेदार’

रजनीकांत यांनी सांगितलं की, जो पक्षाचा नेता असेल तो सरकारचं कोणतंही कामकाज पाहणार नाही. जो मुख्यमंत्री बनेल तो पक्षाचा प्रमुख बनू शकणार नाही. मी पक्षाचा नेता असेल आणि दुसरं कोणीतरी सीएम पदाचा दावेदार असेल. आमचा पक्ष आमच्याच सरकारला प्रश्न विचारेल. जर काही चुकीचं झालं तर पक्ष त्याच्याविरोधात कारवाई करेल.”