1971 ची चूक करू नका अन्यथा PoKचं काय होईल ते समजून घ्या, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त बुधवारी राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की १९७१ च्या चुकांची पुनरावृत्ती करू नका, अन्यथा POK काय होईल हे चांगल्या प्रकारे समजले पाहिजे.

राजनाथ सिंह म्हणाले, ‘पंडितजी म्हणाले होते की कलम ३७० रद्द व्हायला हवे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही असेच म्हटले होते आणि त्यासाठी बलिदान दिले होते. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात असे म्हटले की जर आपले सरकार बनले तर आपण ३७० आणि ३५ए संपवू. आम्ही आमचे आश्वासन पूर्ण केले कारण आम्ही फक्त सरकार बनवण्यासाठी राजकारण करीत नाही. जर आमच्या पक्षाने राजकारण केले तर ते देश घडविण्यासाठीच करू. आम्ही कलम ३७०, ३५ ए रद्द करून हे दाखवून दिले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष जनतेच्या हितासाठी आणि आपण दिलेल्या शब्दासाठी कटिबद्ध आहे आणि आमच्या बोलण्यात आणि कृतीत कोणताही फरक असू शकत नाही.’

पाक सार्वभौमत्वावर हल्ला झाला नाही
संरक्षणमंत्री म्हणाले, ‘शेजारी देशाला मात्र हे पचत नाही. बंधूनो, मात्र त्यांना हे पचवावेच लागेल. १९७१ मध्ये पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि पाकिस्तान आणि बांगलादेशची स्थापना झाली. माझे पाकिस्तानला सांगणे आहे की ७१ च्या चुकांची पुनरावृत्ती करू नका, अन्यथा पीओकेचे काय होईल हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. ते म्हणाले, दहशतवाद संपवण्याचा भारत प्रयत्न करीत आहे पण बालाकोटवर हल्ला करूनही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर भारताने हल्ला केलेला नाही.

कार्यक्रमात उपस्थित लोकांना उद्देशून राजनाथ सिंह म्हणाले, “बंधूंनो, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आमच्या ४०-४१ सीआरपीएफ जवानांना ठार मारले तेव्हा आम्ही काय करू शकतो ते दाखवले, तरीही आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला नाही. बालाकोटमध्ये जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, तिथेच सैनिकांनी हल्ला केला. पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला होणार नाही याची आम्ही खूप काळजी घेतली. म्हणजेच आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वालाही आव्हान दिले नाही. आम्ही किती प्रमाणात काळजी घेतली, परंतु जर हे असेच चालू राहिले तर पुढे काय होईल याबद्दल काहीही सांगितले जाऊ शकत नाही.”

POK वर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानने POK चे अस्तित्व स्वीकारण्याचा अर्थ असा नाही की आपण देखील पीओकेचे अस्तित्व मान्य केले. ते म्हणाले, जर आपण पाकिस्तानचे अस्तित्व मान्य केले तर आपण पीओकेचे अस्तित्व देखील स्वीकारतो असे समजू नये. आम्ही पीओकेच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही कारण पाकिस्तानने यावर जबरदस्तीने कब्जा केला आहे. म्हणूनच आजही जम्मू-काश्मीर विधानसभेत पीओकेसाठी २४ जागा रिक्त ठेवल्या जात आहेत.

Visit : policenama.com