देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांनी फक्‍त 4 दिवसात कमवले 500 कोटी रूपये, तुमच्या जवळ देखील संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक स्थिती आणि इक्विटी बाजारातील परिस्थिती कमजोर होत असताना प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांनी मोठी कमाई केली आहे. राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांनी 4 बाजार सत्रात 483.75 कोटी रुपयांची कमाई केली, दोघांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स होते. त्यात त्यांना मोठा परतावा मिळाला.

jhunjhunwala

राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे जवळपास 6968.12 कोटी रुपयांचे शेअर्स होते, टायटनमध्ये राकेश झुनझुनवाला यांची भागीदारी 5.75 टक्क्यांबरोबर 5.10 कोटी शेअर्स आहे. तर त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे कंपनीमध्ये 1.30 टक्के भागीदारी असून एकूण 1.15 कोटी शेअर्स आहेत.

17 वर्षापूर्वी 3 रुपये भावाने खरेदी केले होते टायटनचे शेअर्स –
एप्रिल जून तिमाही संपल्यानंतर राकेश झुनझुनवाला टायटनचे शेअर्स एकूण 394.74 कोटी रुपयांचा फायदा झाला. या दरम्यान त्यांच्या पत्नीने टायटन शेअर्स मधून 89.01 कोटी रुपयांची कमाई केली. त्यांनी 2002-03 साली टायटन कंपनीचे 6 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केली होती. त्यावेळी एक शेअर्स 3 रुपयांना दिले. जे वाढून नंतर 1,000 रुपये प्रति शेअर्स पेक्षा जास्त वाढले आहे.

टायटनच्या शेअर्समध्ये का आली अचानक तेजी –
4 सप्टेंबरला टायटन शेअर्स 1037.5 रुपये प्रति शेअर्सने ट्रेड करत होते. पंरतू यानंतर कंपनीचे शेअर्स 80 अंकापंर्यंत वाढले. इकरा ने टायटानला 400 कोटी रुपयांसाठी कमर्शिअल पेपरसाठी A1+ रेटिंग दिली होती. 1700 कोटी फंड आणि नॉन फंड बेस्टला देखील AA+ आणि A1+ रेटिंग देण्यात आले होते. इकराने कंपनीला 1500 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉजिट प्रोग्रामला आऊटस्टॅडिंग रेटिंग दिली. टायटनची लिक्विडिटी पाहून इकराने पॉजिटिव रॅकिंग दिली होती.