Rakesh Jhunjhunwala यांनी 3 दिवसात ‘या’ शेयरमध्ये कमावले 310 कोटी रुपये, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | शेयर बाजारचे बिगबुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे नेटवर्थ मागील काही दिवसात अनेक पटींनी वाढले आहे. ज्याचे कारण आहे नजारा टेक, टायटन कंपनी (titan company), टाटा मोटर्स सारख्या शेयरमध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक. Tata Motors ची शेयर प्राईस हिस्ट्री पाहिली तर राकेश झुनझुनवाला यांनी केवळ तीन व्यवहाराच्या सत्रात या शेयरमधून 310 कोटी रुपये कमावले आहेत.

 

असे कमावले 310 कोटी
6 ऑक्टोबर 2021 ला Tata Motors ची शेयर प्राईस 335.60 रुपये होती जी केवळ तीन व्यवहाराच्या सत्रात वाढून 417.80 रुपये झाली. म्हणजे केवळ तीन दिवसात टाटा मोटर्सचा शेयर 25% पर्यंत वर गेला होता. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे Tata Motors ची 1.14% भागीदारी आहे. या हिशेबाने त्यांनी केवळ तीन व्यवहाराच्या सत्रात 310 कोटी रुपयांचा नफा कमावला.

 

सोमवारी 7.39 टक्के तेजी
सोमवारी बीएसईवर हा शेयर 7.39 टक्के तेजीहस 411.25 रुपयांवर व्यवहार करत होता. तर टाटा मोटर्सच्या डीव्हीआरचा शेयर 5 टक्केपेक्षा जास्त तेजीसह 201.10 रुपयांवर बंद झाला.

 

बिगबुलकडे टाटा मोटर्सचे 3,77,50,000 शेयर
जून 2021 तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेयर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे या कंपनीचे एकुण 3,77,50,000 शेयर होते. हे कंपनीच्या एकुण 1.14% भागीदारीच्या समान आहे.

 

यापूर्वी मार्च 2021 तिमाहीत झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 4,27,50,000 शेयर होते. जून तिमाहीत बिगबुलने टाटा मोटर्समध्ये आपली भागीदारी कमी केली होती.

 

एकुण भागीदारी 1.14%
मार्च तिमाहीत टाटा मोटर्समध्ये जिथे राकेश झुनझुनवाला यांची भागीदारी 1.14% होती तर जून तिमाहीत कमी होऊन 1.14% राहिली. Tata Motors ने आता सप्टेंबर तिमाहीच्या शेयर होल्डिंग पॅटर्नची घोषणा केलेली नाही.

 

जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला?
टाटा मोटर्सच्या शेरमध्ये मागील काही दिवसात चांगली तेजी असून मार्केट एक्सपर्ट याबाबत बुलिश आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, Tata Motors च्या शेयरचा फ्रेश ब्रेकआऊट 400 रुपयांवर आहे. जर शेयरने ही लेव्हल ओलांडली तर यामध्ये आणखी तेजी येईल.

Choice Broking चे एग्झीक्यूटिव्ह डायरेक्टर समीत बागडिया यांनी म्हटले,
Tata Motors चा नवीन ब्रेकआऊट 400 रुपये आहे.
याचा अर्थ आहे की चार्ट पॅटर्नवर तो अजूनही पॉझिटिव्ह दिसत आहे.
450 रुपयांच्या टार्गेटसोबत तो खरेदी करता येऊ शकतो. मात्र त्याचा स्टॉप लॉस 390 रुपयांवर लावा.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala earn money rupees 310 crore from this tata stock in 3 sessions check

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | पेट्रोल पंप उघडून दरमहा करा लाखोची कमाई, मोदी सरकारने आणली नियमांमध्ये शिथिलता

Pune Crime | ‘मोमोज’चे पैसे मागितल्याने गुंडांचा कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

Gold Silver Price Today | सोने-चांदी आज किती झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर