Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 10 मिनिटात टाटा समुहाच्या 2 शेयरमधून कमावले 186 कोटी, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी टाटा समूहा (Tata Group) च्या 2 शेअर्समधून अवघ्या 10 मिनिटांत 186 कोटी रुपये कमावले. वास्तविक, यामुळे टाटा समुहातील टायटन कंपनी (Titan Company) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) या दोन कंपन्यांचे शेयर वाढले. इंग्रजी बिझनेस न्यूज वेबसाइट मिंटने ही बातमी दिली आहे. (Rakesh Jhunjhunwala)

 

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत सोमवारी NSE वर रु. 2,398 वर बंद झाली. मंगळवारी, शेअर 23.95 रुपयांच्या वाढीसह उघडला. त्यानंतर तो 2,435 रुपयांवर गेला. अशाप्रकारे, शेयर बाजार सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांत, सोमवारी त्याच्या बंद स्तरापासून, प्रति शेअर सुमारे 37 रुपयांनी वाढला.

 

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची टायटनमध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे या कंपनीत 3,57,20,395 शेयर्स म्हणजेच सुमारे 4.02 टक्के शेयर्स आहेत. याशिवाय त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत 1.07 टक्के भागीदारी आहे. त्यांचा या कंपनीत एकूण 5.09 टक्के हिस्सा आहे.

 

टाटा मोटर्सचा शेयर मंगळवारी 4.70 रुपयांनी वाढून 476.15 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो 476.25 रुपयांवर पोहोचला. अशाप्रकारे, सोमवारच्या 471.45 रुपयांच्या बंद किमतीच्या तुलनेत तो प्रति शेअर 4.80 रुपये वाढला. राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये 1.18 टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 3,92,50,000 शेयर्स आहेत.

टायटनच्या शेयर्समध्ये झालेल्या वाढीमुळे मंगळवारी सकाळी राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सुमारे 167 कोटी रुपयांची (37 X 4,52,50,970) वाढ झाली.
त्याचप्रमाणे टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती सुमारे 19 कोटी रुपयांनी वाढली.
दोन्ही शेयर एकत्र करून, मंगळवारी सकाळी अवघ्या 10 मिनिटांत त्यांची एकूण संपत्ती 186 कोटी रुपयांनी वाढली आहे.

 

शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.
बाजारातील घसरण अशा वेळी झाली जेव्हा एलआयसी आयपीओ सादर करणार आहे.
अशा स्थितीत घसरणीचा फटका या मेगा इश्यूला बसू शकतो. जगभरातील शेअर बाजार दबावाखाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

परदेशी फंडांच्या विक्रीमुळे भारतीय बाजारात घसरण जास्त आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय बाजारात परदेशी फंड सातत्याने विक्री करत आहेत.
त्यामुळे बाजारावर दबाव वाढला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala earns 186 crores in 10 minutes know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dattatray Bharne | राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

 

Health Benefits Of Tulsi | कोणत्याही रामबाण औषणापेक्षा कमी नाही तुळस, जाणून घ्या याचे 6 फायदे

 

Gold Price Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, सोनं पुन्हा 50 हजारांवर, जाणून घ्या आजचा भाव