आयटम गर्ल राखी सावंतने दादासाहेब फाळके पुरस्काराचा केला ‘असा’ अपमान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी चित्रपटात पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारणाऱ्या राखीला यावरून ट्रोल करणाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले. चित्रपटात पाकिस्तानी बनलेल्या मुलीच्या हातात पाकचा झेंडा नसेल तर काय भारताचा असेल काय ? असा सवाल तिने केला. यावरुन ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलीच तंबी दिली. मला ट्रोल करु नका. माझे डोके खराब करु नका. नाहीतर याच अवाॅर्डने मारेल. अशा भाषेत तिने सडेतोर उत्तर दिले. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे म्हणजे कौतुकास्पद आहे. तरी या अवॉर्डची किंमत न ठेवता तिने ‘याच अवॉर्ड ने मारेल’ अशा भाषेत दादासोहब फाळके पुरस्काचा अपमान केला.

नुकताच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘बेस्ट आयटम’ डान्सर म्हणून तिला गौरविण्यात आले. हा अवॉर्ड मिळताच युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यामुळे राखी खुप चिडली आणि म्हणाली की, ‘मला ट्रोल कराल तर याच अवॉर्डने मारेल’ अशी धमकी दिली.

एका युजरने तिला प्रश्न केला की, ‘हा अवॉर्ड कितीला खरेदी केला ? इंडस्ट्रीला वेड लागलेय, तेव्हाच तुला हा पुरस्कार मिळाला’ असे एका व्यक्तीने विचारले. पण तिने हे फारसे मनावर घेतले नाही. मात्र जेव्हा तिचा पारा चढला तेव्हा तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

अभिनेत्री राखी सावंत म्हणाली की, ‘देवाचे आभार.. आता आयटम गर्ललाही अवॉर्ड मिळू लागलेत. मी माझ्या आयुष्यात १०० हून अधिक आयटम सॉंग्स केले. तरी आजपर्यंत मला पुरस्कार मिळाला नाही. माझे सर्व ‘शो’ हिट झाले. पण कधीच पुरस्कार मला दिला गेला नाही. माझी इतकी लायकी नाही की, मी पुरस्कार खरेदी करु शकेल. मी १२ वर्षापासून इंटस्ट्रीमध्ये आहे. माझे इतके गाणे हिट झाले. पण एकही पुरस्कार मला दिला नाही. हा पुरस्कार विचार करुन मला देण्यात आला आहे.’