‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत विवाहित ! Bigg Boss मध्ये अर्शी खाननं केली अ‍ॅक्ट्रेसची ‘पोलखोल’

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Season 14) मध्ये 6 नवीन चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. रविवारी शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) यानं या 6 चॅलेंजर्सला इंट्रोड्युस केलं आहे. यात राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, कश्मीरा शाह, अर्शी खान आणि मनू पंजाबी यांचा समावेश आहे. चॅलेंजर्स प्रीमियर नाईटच्या वेळी स्टेजवर त्यांच्यातील वादाची झलक पाहायला मिळाली. यावेळी अर्शी खान (Arshi Khan) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी एकमेकींची पोलखोल केली.

अर्शी आणि राखी यांना एक टास्क फ्रेनेमी दिलं गेलं. यात एकाच्या प्रश्नाचं दुसऱ्यानं खरं खरं उत्तर द्यायचं होतं. यावेळी अर्शीनं तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं. अर्शी म्हणाली, तू किती लग्न केलेस ? यावर राखी म्हणाली, माझा पती मिस्टर इंडिया आहे. आहे पण नाही. मी 4 लग्न केले आहेत. 3 सलमान सरांची सुरक्षा करत आहेत आणि जो एक आहे तो जिवंत आहे.

राखीचं गोलमाल उत्तर ऐकून अर्शी म्हणाली, म्हणजे आहेच ना. यानंतर राखीही स्माईल करताना दिसते. तिनं इशाऱ्यातूनच तिच्या लग्नाचं अधुरं सत्य सांगितलं. आता राखीचं हे उत्तर एक तर सत्य होतं किंवा चेष्टा. याचं उत्तरही आता राखीलाच ठाऊक आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राखीचं लग्न सस्पेन्स बनलं आहे. तिचे वधूच्या लुकमधील फोटो समोर आल्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती.

अशी चर्चा होती की, 28 जुलै 2019 रोजी राखी सावंतनं एनआरआय मुलासोबत गुपचूप लग्न केलं आहे. तिनं जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये लग्न केलं आहे. 28 जुलै रोजी राखी विवाहबंधनात अडकली असंही सांगितलं जात होतं.