‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतनं पहिल्यांदाच शेअर केला पतीचा फोटो , पंरतु यातही ट्विस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमी चर्चेत असणारी काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. चर्चेत राहण्यासाठी तिच्या काही ना काही कुरापती सुरुच असतात. गेल्या अनेक दिवसांपासून राखी सिक्रेट लग्न आणि न पाहिलेल्या नवऱ्यामुळे चर्चेत आहेत. राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ती युकेमध्ये पतीकडे गेली आहे. व्हिडीओसोबतच राखीने आपल्या पतीचा फोटो शेअर केला आहे. परंतु यातही एक ट्विस्ट आहे.

राखीने शेअर केलेल्या व्हिडीओसोबतच तिने 9 लोकांचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. यातून तिने फोटो पाहून तिचा पती कोण असेल यासाठी अंदाज लावण्यासाठी सांगितले आहे. यावर अनेकांनी कमेंटही केली आहे. तिचा पती नेमका कोण आहे हे तिने सांगितले नसले तरी यातील कोणी एक तिचा पती आहे असे सांगितले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटापासून तर तिच्या प्रेग्नंसीपर्यंत अनेक अफवा समोर येऊन गेल्या. राखीने वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्याने तिच्या चाहत्यांनी असे वेगवेगळे अंदाज बांधले होते. अनेक फोटो आणि व्हिडीओंमुळे राखी ट्रोल होतानाही दिसून आली होती. सध्या राखीच्या पतीचे फोटो आणि तिचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते तिचा पती कोण असेल याबाबत अंदाज लावताना दिसत आहेत.

 

Visit : Policenama.com