‘हे’ काम केलं तर ‘कोरोना’ स्पर्शदेखील करणार नाही, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचा दावा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची ड्रामा क्वीन नेहमीच आपल्या उलट सुलटच वक्तव्यानं चर्चेत येत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओत राखी कोरोना व्हायरसबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. राखीनं हेही सांगितलं आहे की, हा व्हायरस का पसरत आहे आणि याच्या उपचारासाठी काय करावं. चाहत्यांना व्हिडीओ लक्ष देऊन ऐकायला सांगत आहे.

राखीनं नुकताच तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत ती कोरोनाबद्दल बोलत आहे. व्हिडीओ शेअर करताना राखी म्हणते, “प्लीज प्लीज माझं ऐका.” व्हिडीओत बोलताना राखी म्हणते, “मी विनंती करते मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐका. सर्व लोक सांगत आहेत, हाथ धुवा, पाय धुवा, तोंड धुवा, काय काय धुवायला सांगत आहेत. आत्मा कसा धुवाल. आपण पाप केलं आहे. जगभर लोक पाप करत आहेत. कोरोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. आता देवाच्या चरणात शरणात जा. आपल्या पापांची माफी मागा. प्लीज सरेंडर क. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सर्वच धर्मातील लोकांना कोरोना होत आहे. देवाच्या चरणात शरण जा. मी वचन देते कोरोना तुम्हाला टचही करणार नाही.”

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी राखीच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. राखीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

https://www.instagram.com/p/B0z3VMugrzA/