रकुल प्रीत सिंह करणार आयुष्मान खुरानासोबत ‘रोमँस’ ! ‘या’ सिनेमात Entry

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रकुल प्रती सिंह (Rakul Preet Singh) हिनं बॉलिवूडपासून तर साऊथपर्यंत आपली ओळख तयार केली आहे. रकुलचा बिकिनी लुक असो किंवा मग, ग्लॅमरस लुक असो किंवा आणखी कोणता लुक तो नेहमीच चर्चेत येत असतो. रकुल आता तिच्या आगामी ५६ू सिनेमामुळं चर्चेत आली आहे. लवकरच ती बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत डॉक्टर जी नावाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. यात दोघांचा रोमँस पहायला मिळणार आहे.

पहिल्यांदाच एकत्र दिसणार ‘रकुल-आयुष्मान’

एका इंग्रजी वृत्तानुसार, सिनेमाच्या टीमनं सांगितलं आहे की, रकुल प्रीत सिंह सिनेमात लिड अॅक्ट्रेस म्हणून दिसणार आहे. यात आयुष्मान आणि ती पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे.

अशी असणार भूमिका

सिनेमात रकुल एका मेडिकल स्टुडेंटच्या भूमिकेत असेल. डॉ फातिमा असं तिच्या भूमिकेचं नाव असेल. या कॅम्पस कॉमेडी ड्रामामध्ये आयुष्मान डॉ उदय गुप्ताच्या भूमिकेत असेल. आयुष्मान रकुलच्या कॉलेजात सीनियर असणार आहे.

रकुल प्रीत देखील सिनेमाचा हिस्सा बनल्यानंतर खूप खुश आहे. तिनं यावर भाष्यही केलं आहे. मी सिनेमासाठी खूप उत्साहित आहे. ही एक इंटरेस्टींग स्टोरी असेल. आता मला शुटींगची प्रतिक्षा आहे असंही तिनं सांगितलं.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अनुभूती कश्यप सिनेमा डायरेक्ट करत आहे. हा सिनेमा सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत सोबत डायरेक्टर अनुभूती कश्यप यांनी लिहिला आहे.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल. आता ती डॉक्टरजी सिनेमातही आयुष्मान खुराना सोबतही काम करणार आहे. गिल्ली या कन्नड सिनेमातून तिनं फिल्मी प्रवास सुरू केला होता. 2014 साली आलेल्या यारियां सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.