‘मोदींना ऑस्कर द्या’; राम गोपाल वर्मांनी व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आहे. रुग्णसंख्या वाढत आहे तर मृतांचे प्रमाणही अधिक आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी ते भावूक झाले होते. त्यानंतर आता यावरूनच चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ट्विटवर व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवली.

पंतप्रधानांची खिल्ली उडवत राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ही ‘अँड ऑस्कर गोज टू…’ असं म्हणते त्यानंतर हॉलमध्ये एकच शांतता पसरल्याचे दिसत आहे. ती कोणाचे नाव घेते याकडे सर्वांचे लक्ष जाते. तेवढ्यात मोदींनी केलेल्या भावूक भाषणही दाखवले जाते. त्यानंतर हा ऑस्कर मोदींनाच मिळतो.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटवर एडिट केलेला मॉर्फ व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राम गोपाल वर्मा यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियावर #ऑस्कर हा शब्द ट्रेंड होऊ लागला होता. शिवाय या हॅशटॅगखाली मोदींच्या आणखीही काही भाषणांच्या क्लिप ट्रोलर्स शेअर करत होते. याच हॅशटॅगखाली राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, राम गोपाल वर्मा हे बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक आहेत. त्यांनी कंपनी, सरकार, रंगीला, सत्या यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून 90 चे दशक गाजवले होते. मात्र, गेल्या काही कालावधीत चित्रपटांपेक्षा ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत आहेत. देशभरात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ते रोखठोक प्रतिक्रिया देतात.