Tandav Controversy : आमदार राम कदमांनी ‘तांडव’ विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल केला गुन्हा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अ‍ॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात काही शहरात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. आमदार राम कदम यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठिय्या आंदोलन कलं. बुधवारी राम कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तांडवमधील अभिनेता सैफ अली खानसह संबंधित कलाकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तांडव सीरिजमधील काही आक्षेपार्ह दृश्यामुळं ही सीरिज वादात आहे. मुंबईसह ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर तांडवविरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी दोन दिवस आंदोलन सुरू होतं. बुधवारी राम कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तांडवच्या ग्रुपविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डायरेक्टर अली अब्बास जफर, अ‍ॅमेझॉनच्या हेड अपर्णा पुरोहित, प्रोड्युसर हिमांशु किशन मेहरा, लेखक गौरव सोलंकी, सैफ अली खान, अमित अग्रवाल यांसह इतर कलाकार या प्रकरणात आरोपी असल्याचं सांगितलं गेलं आहे. या प्रकरणी आता संबंधितांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे.