71 वर्षांची झालीय रामायणातील ‘कैकई’; आता तुम्हाला ओळखता येणार नाही, जाणन घ्या कोण आहे ‘कैकई’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  रामायण या छोट्या पडद्यावरील मालिका खूप गाजली होती. याच मालिकेतील कैकईची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीला आता तुम्ही ओळखू शकणार नाही. कारण, कैकई आता 71 वर्षांची झाली आहे. कैकईची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीचं नाव आहे पद्मा खन्ना.

अभिनेत्री पद्मा खन्ना हि आज आपला 71 वा वाढदिवस साजरा केला. 10 मार्च 1949 रोजी बिहारच्या पटना येथे जन्मलेल्या पद्मा खन्ना हिने रामानंद सागरच्या सदाहरित मालिका रामायणात कैकायची भूमिका साकारली आहे. या छोट्या पडद्यावर रामायणासह इतरही मालिका, शो मध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली आहे.

‘रामायण’मधील भूमिकेमुळे पद्माने सर्वाधिक लोकप्रियता मिळविली असली तरी छोट्या पडद्यापेक्षा तिने मोठ्या पडद्यावर अधिक काम केले आहे. वयाच्या 7 व्या वर्षांपासून पंडित बिरजू महाराजांकडून त्यांनी कथक शिकण्यास सुरुवात केली. टीव्ही अभिनेत्री पद्मिनी आणि वैजंतीमाला यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

1970 ते 1980 या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांत काम केले. हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं म्हंटलं तर, हीर रांझा, पाकीजा, सौदागर, डाग, पापी, हेराफेरी आणि ‘घर घर की कहानी’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. भोजपुरी सिनेमाबद्दल बोलायचं म्हंटलं तर पद्मा बिदेसिया, बलम परदेशीया, धरती मैया, गोडना, भैय्या दूज आणि हे तुलसी मईया आदी चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हंटलं तर पद्मा यांनी दिवंगत चित्रपट दिग्दर्शक जगदीश एल. सिदना यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर दोघंही 1990 मध्ये अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे शिफ्ट झाले होते. इथं त्यांनी आपली कथक नृत्य अकादमी उघडली. आता त्यांची अकादमी चालविण्यासाठी त्यांना मुले मदत करतात.

अभिनेत्री पद्मा खन्ना यांनी 1990 च्या काळात हिंदी चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली होती. या काळात अनेक जण मोठ्या पडद्यावर काम करून नाव मिळवत होते. मात्र, अभिनेत्री पद्मा खन्ना यांनी तर छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ या मालिकेत कैकईची भूमिका साकारून आपलं नाव केलं होतं. त्यामुळेच अभिनेत्री पद्मा खन्ना यांना लोक आजही कैकई म्हणून ओळखत आहेत. आता त्यांनी आपला 71 वा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच त्यांनी जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.