Ramdas Kadam | ‘उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचे नाही’ – रामदास कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे गटात (CM Eknath Shinde) सामील झालेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर चालण्याऐवजी ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांवर चालत आहेत, असे सांगत मला तर असं संशय आहे की, मराठा समाजाचे (Maratha Community) लोक जे मोठे होत आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांना मोठे होऊ द्यायचे नाही, त्यांना संपवायचे आहे. कोणत्याही मराठा नेत्याला मोठ होऊ द्यायचे नाही, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचा गंभीर आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

 

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचाच पालापाचोळा झालाय, अशा आक्रमक भाषेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) जहरी टीका केली आहे. शिवसेनेच्या उभारणीत आदित्य ठाकरे यांचे योगदान काय? असा प्रश्न त्यांनी केला.

 

कोकणातील शिवसेना संपवत आहेत

ठाकरेंनी तीन वर्ष मला बोलू दिलं नाही, रुग्णालयात असताना सहा बैठका झाल्या. परंतु आम्हाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे तुम्ही रामदास कदम किंवा योगेश कदम (Yogesh Kadam) यांना नाही तर कोकणातील शिवसेना संपवत आहात, असा इशारा कदम यांनी ठाकरेंना दिला.

 

मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत (Sanjay Raut) प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सर्व हस्यास्पद आहे. यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची शिवसेना अशी होती, बाळासाहेबांच्या शिवसेने सोबत, त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना. आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठिक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

 

स्वत:चं आत्मपरिक्षण करा

आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील अमूक गदार, तमूक हरामखोर ही भाषा वापरत आहेत.
ही भाषा वापरण्यापेक्षा स्वत:चं आत्मपरीक्षण (Self-Examination) करुन बघा.
कोण गद्दार आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करुन बघा. 51 आमदार का जातात,
12-14 खासदार का जातात, हजारो नगरसेवक का जातात, आज माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हकालपट्टीशिवाय दुसरं काम काय सुरु आहे. केवळ शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेल करायचं,
आवाहन करायचं एवढच सध्या सुरू आहे. तीन वर्षात जर आमदारांना भेटले असते तर आज ही वेळ आली नसती,
असा टोला कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

 

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam criticized to uddhav thackeray on birthday wish with hard statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा