धक्कादायक…. ४० पुरुषांनी ४ दिवस केला बलात्कार; महिलेचा आरोप

ADV

चंदीगडः पाेलीसनामा ऑनलाईन

तब्बल 40 पुरूषांनी एका महिलेवर 4 दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील पंचकुला जिल्ह्यातील मोरनी येथे घडली. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने मनीमाजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
[amazon_link asins=’B076GBR7JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eaa13e91-8ce7-11e8-a9d6-a5dadf237ce2′]

ADV

पीडित महिलेचा आरोप आहे की, तिला चार दिवस डांबून ठेवण्यात आले होते, तिथे या पुरुषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आमच्या एका ओळखीतल्या इसमाने तिला गेस्ट हाऊसमध्ये ११ ते १२ हजार रुपये महिना पगाराची स्वीपरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर  तिला गुंगीचे औषध दिले आणि चार दिवस तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाहीतर घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता न करण्याची धमकी दिली. असा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पंचकुला पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. सदरची घटना वरिष्ठांना न कळवल्याने तसेच महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन एका महिलेसह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका काॅन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे.
[amazon_link asins=’B01N0FOQ2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f02a2da9-8ce7-11e8-9338-696df4b4e1ed’]

सर्वात गंभीर बाब म्हणजे दररोज सुमारे 10 पुरूषांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 15 ते 18 जुलैपर्यंत सुरू होता. तिने कसाबसा मला फोन केला आणि घडलेली संपूर्ण हकीगत सांगितली. यानंतर मी गेस्ट हाऊसच्या मॅनेजरशी बोललो. तिला ताबडतोब सोडा नाहीतर मी पोलिसांना कळवेन अशी धमकी दिली तेव्हा नंतर ती घरी आली आणि घडलेली सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दिली असे महिलेच्या पतीने सांगितलं