Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rape Case Pune | तरुणीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केला (Forced Abortion) . हा प्रकार सन 2021 ते एप्रिल 2024 या कालावधीत कोरेगाव पार्क (Koregaon Park) आणि विमाननगर (Viman Nagar) येथील स्पा सेंटरमध्ये (Spa Center In Pune) घडला आहे.(Rape Case Pune)

याबाबत पीडित 22 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.25) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गजानन दत्ता आडे Gajanan Datta Aade (वय-27 रा. नांदेड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 313 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन आडे हा कोरेगाव पार्क आणि विमाननगर येथे स्पा सेंटर चालवतो. तर पीडित तरुणी त्याच्या स्पा सेंटरमध्ये कामाला होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. आरोपीने तरुणीला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भारती इंगोले (PSI Bharti Ingole) करीत आहेत.

अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हातवारे

वानवडी : अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हातवरे करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला.
याप्रकरणी एक जणावर पोक्सो (POCSO Act) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 11 वर्षीय पीडीत मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
हा प्रकार 15 एप्रिल रोजी पुणे-सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Road) काळुबाई चौकात (Kalubai Chowk) घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे काळुबाई चौकात एकमेकांच्या शेजारी दुकान आहे.
फिर्यादी यांच्या मुलीच्या शाळेला सुट्टी असल्याने ती दुकानात आली होती.
त्यावेळी आरोपी मुलीला ओठांचा किस केल्याचा इशारा केला.
तसेच दुकानासमोर गाडी लावत असताना मुलीला बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्या स्त्री मनास लज्जा
उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न