६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून नराधम फरार 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. या कृत्यानंतर नराधम फरार झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी बोरी येथील एका शाळेत इयत्ता पहिलीत शिकत असून एका अज्ञात व्यक्तीने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत गावातील निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

परिचारिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

पीडित मुलीने याबद्दल तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी बोरी पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती दिली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी ही घटना आपल्या वरिष्ठांना कळवताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आरोपीचा शोध तात्काळ लावण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू केल्याची माहिती दिली आहे. राज्यभरात बालिका आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून सातत्याने अशा संतापजनक घटना घडत असल्याने पालकांमध्ये तसेच महिला वर्गात संताप आणि भितीचे वातावरण आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या

लातूर :  एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना औसा तालुक्यातील तुंगी येथे घडली. औसा पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सबिया महेबुब गुळजे (२५), असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या शिरूरअनंतपाळ तालुक्यातील वांजरखेडा येथील रहिवासी होत्या. सबिया यांच्या चारित्र्यावर महेबूब संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने खटके उडत होते. शिवाय महेबूब हा आई-वडिलांपासून विभक्त झाला होता. त्यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. घरी कोणी नसल्याचे पाहून महेबूब याने सबिया यांचा गळा चाकूने चिरुन खून केला. घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी सबियाचे वडील यांनी औसा पोलीस ठाण्यात महेबूब गुळजे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपीवर कलम खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात