Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात सेवा देणाऱ्या रॅपिडो बाईक टॅक्सी (Rapido Bike Taxi) कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे. रॅपिडो कंपनीला (Rapido Bike Taxi) आज दुपारी एक वाजेपासून बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यातील रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विविध शहरांमध्ये रॅपिडो कंपनीकडून बाइक टॅक्सी सेवा (Rapido Bike Taxi) दिली जात आहे. मात्र, ही सेवा बेकायदेशीर (Illegal) असून, अशा प्रकारची सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही, असे न्यायालयात परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे रॅपिडो कंपनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) गेली होती. त्यावेळी राज्य सरकारने (Maharashtra State Government) आठ दिवसांत आपली भूमिका मांडून धोरण स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर शुक्रवारी (दि.13) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने रॅपिडो कंपनीला आज दुपारी एक वाजेपासून सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 

न्यायालयाच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांना दिलासा

मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (Roppen Transportation Services Pvt. Ltd.)
यांनी अ‍ॅग्रिगेटर लायसन्स (Aggregator License) मिळावे यासाठी केलेल्या अर्जाचा फेरविचार करण्याचे
आदेश न्यायालयाने 29 नोव्हेंबर रोजी दिले होते. परंतु दुचाकी आणि तिनचाकी टॅक्सीसाठी अ‍ॅग्रिगेटर लायसन्सचा फेरअर्ज पुणे आरटीओने (Pune RTO) नाकारला होता.
यानंतर कंपनीने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली.
सरकारच्या वतीने परिवहन विभागाने त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडले. कोर्टाने आज घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यातील रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title :-  Rapido Bike Taxi | pune rapido high court order to stop all bikes services

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

Nashik Graduates Constituency Election | सुधीर तांबेनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका