Rashmi Bagal | रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? त्यांच्यावर होता उध्दव ठाकरेंचा ‘विश्वास’

सोलापूर : Rashmi Bagal | ज्यांच्यावर नेतृत्वाने विश्वास टाकला, आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली आणि मंत्रिपदे दिली त्या जवळच्या सहकार्‍यांनी विश्वासघात करण्याचे सत्र शिवसेनेत अजूनही सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे न भूतो न भविष्यति असे नुकसान झाले. त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले, मुख्यमंत्रीपद गेले आणि राज्यातील सत्ताही गेली. परंतु, अजूनही शिवसेनेला असे धक्के बसण्याचे सत्र सुरूच आहे. कारण, 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवत करमाळ्याची उमेदवारी दिली त्या रश्मी बागल (Rashmi Bagal) देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Group) यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील (Karmala in Solapur) उमेदवारी रश्मी बागल (Rashmi Bagal) यांना दिली होती. आता त्याच रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. रश्मी बागल यांनी मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांची त्यांच्या पुण्यातील घरी भेट घेतली आहे. या भेटीनंतर बागल यांच्याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले बागल कुटुंबिय नंतर शिवसेनेत गेले. आता बागल यांची व्हाया शिवसेनेतून शिंदे गटाकडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेने (Shiv Sena) 2019 विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल यांना करमाळ्यातून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहिले होते. परंतु मतात फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे आमदार म्हणून निवडून आले. याच नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्न मंत्री तानाजी सावंत करत आहेत.

तानाजी सावंत यांनी पुण्यातील त्यांच्या घरी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली.
नारायण पाटील अगोदरच शिंदे गटात गेले आहेत.
आता रश्मी बागल यांनाही शिंदे गटात आणून सोलापुरमध्ये राष्ट्रवादीला शह देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

रश्मी बागल या दिवंगत माजी सहकार राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत. दिगंबरराव बागल हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर रश्मी बागल यांच्या आई शामल बागल यांना राष्ट्रवादीने आमदार केले. 2014 मध्ये राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. परंतु 257 मतांनी त्यांचा पराभव झाला.

रश्मी बागल या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिकादेखील आहेत.
2019 मध्ये रश्मी बागल यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
त्यावेळी करमाळ्यातून बागल यांना उमेदवारी मिळावी यासाठी तानाजी सावंत आग्रही होते.
त्यामुळे बागल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
परंतु पाटील-बागल यांच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना झाला होता.

Web Title :- Rashmi Bagal | shivsena chief uddhav thackerays group shivsena leader rashmi bagal will join cm eknath shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती

Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | सियाचिनमध्ये देशसेवा करताना धुळ्याचे जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण