कर्नाटकच्या रश्मीने रचला इतिहास, बनली ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनची अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या रश्मी सामंतची ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रश्मी पहिली भारतीय महिला आहे, जिने लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे पद मिळवले आहे. रश्मी मणिपाल इंन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची माजी विद्यार्थीनी सुद्धा आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, रश्मी सामंतला या पदासाठी अन्य तीन प्रतिस्पर्ध्यांच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त मते मिळाली आहे. संघाच्या अध्यक्ष पदासाठी टाकण्यात आलेल्या 3,708 मतांपैकी रश्मीने 1,966 मते मिळवली, जी इतर सर्व उमेदवारांपेक्षा जास्त आहेत.

रश्मी सामंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिनकेयर कॉलेजमध्ये एनर्जी सिस्टममध्ये एमएससीची विद्यार्थीनी आहे. ती चार मुख्य प्राथमिकतांना समोर ठेवून ऑक्सफर्ड एसयू अध्यक्षपदासाठी निवडणूक लढली, ज्यामध्ये तिला मोठे यश मिळाले.

आपल्या मेनिफेस्टोमध्ये रश्मी युनिव्हर्सिटी आणि कॉलेज कॉन्फरन्समध्ये साम्राज्यवादी प्रतिमा हटवण्याची भूमिका मांडत राहिली. रश्मीने कोरोना महामारी नष्ट होईपर्यंत प्रमुख गरजा माफ करण्याची सुद्धा मागणी केली होती.

रश्मीचे वडील दिनेश सामंत परकलामध्ये उद्योगपती आहेत. तर आई वत्सला होममेकर आहे. रश्मी मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (2016-2020 बॅच), ची पदवीधारक विद्यार्थीनी आहे. ती मणिपालमध्ये स्टुडंट कौनिसलची तंत्रज्ञान सचिव होती.