रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) आणि अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. (amravati sp dr haribalaji N.) यांच्यावर अमरावती पोलीस आयुक्तालयात (amravati police)  कार्यरत असलेल्या वरीष्ठ लघुलेखकाने (senior shorthand writer filed complaint against rashmi shukla and amravati sp) गंभीर आरोप केले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पदाचा दुरुपयोग करून खोटी प्राथमिक चौकशी बसविणे, चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध दबाव टाकणे, खासगी आयुष्यात गोपनीयतेचा भंग करण्यासह इतरही गंभीर स्वरूपाचे काम रश्मी शुक्ला आणि पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी केल्याची तक्रार कर्मचा-याने गाडगेनगर पोलिस ठाण्यात केली आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे.

देवानंद भोजे (Devananda Bhoje) असे आरोप केलेल्या लघुलेखकाचे आहे. भोजे यांनी 18 जून रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात 18 पानांची तक्रार दिली आहे.  रश्मी शुक्ला आणि डॉ. हरीबालाजी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील लघुलेखक व टंकलेखक जगदीश देशमुख, पोलिस शिपाई रूपेश पाटील, किशोर शेंडे यांच्यासह अन्य पाच, असे एकूण 11 जण या कटात सहभागी होते, असा आरोप भोजे यांनी केला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा भंग केला, इंडियन टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन करणे, तसेच स्वत:ची व कुटुंबाची बदनामी केली, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली, फोन टॅपिंग, शारीरिक व मानसिक छळ करण्याचा आरोप भोजे यांनी केला. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Rashmi Shukla | senior-shorthand-writer-filed-complaint-against-rashmi-shukla-and one sp, demand of action

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक