Rashmika Mandanna | मॅनेजरने केलेल्या लाखोंच्या फसवणूक प्रकरणाबाबत अभिनेत्री रश्मिकाने मांडले तिचे मत

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशाची क्रश अशी ओळख असेलली पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने अभिनय क्षेत्रात आपली दमदार ओळख निर्माण केली. ती तिच्या चित्रपटांमुळे सर्वत्र चर्चेत असते. मागील काही दिवसांपूर्वी रश्मिकाची लाखोंची फसणवूक झाल्याची माहिती सर्वत्र व्हायरल झाली होती. तिची ही फसवणुक तिच्या मॅनेजरने केली असल्याचे सांगितले जात होते. हे प्रकरण खूप गाजल्यानंतर आता अभिनेत्री रश्मिकाने (Rashmika Mandanna) यावर आपले मत मांडले आहे. तिने अखेर या प्रकरणावर मौन सोडून एका निवेदनाद्वारे मत जाहीर केले आहे.

रश्मिकाला लाखोंचा गंडा घालण्यात आले असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी प्रकाशित केले. यावर रश्मिकाने आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर तिला अनेक जण याविषयी प्रश्न करु लागले. सर्वांसाठी तिने एक निवेदन जाहीर केले आहे. या अधिकृत निवेदनात रश्मिका मंदाना आणि मॅनेजर दोघींनीही त्यांच्यामध्ये कोणतेही वैर नसल्याचे सांगितले आहे. या निवेदनात तिने लिहिले आहे की, “आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. आम्ही सलोख्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का वेगळे होत आहोत या अफवांमध्ये तथ्य नाही. आम्ही पूर्णपणे एका व्यवसायात आहोत आणि आम्ही आतापासून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.” (Rashmika Mandanna Manager Case)

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) करिअरच्या सुरुवातीपासून एकत्र काम करत असलेल्या या मॅनेजरने 80 लाखांना गंडवले असल्याचे बोलले जात होते. मात्र या दोघांनी ही बाब नाकारली असून आणि सहमताने विभक्त होत आहोत असे जाहीर केले आहे. अभिनेत्री रश्मिकाने आता बॉलीवुडमध्येही (Bollywood) एन्ट्री केली आहे. तिचा पहिला चित्रपट ‘गुडबाय’ (Goodbye) मध्ये तिने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोबत काम केले. तिने मिशन मजनू (Mission Majnu) या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Actor Siddharth Malhotra) सोबत काम केले. आता तिचा लवकरच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ॲनिमल चित्रपट (Animal movie) येणार आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title :   Rashmika Mandanna | rashmika finally broke her silence on the 80 lakh fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall