Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केले आहे गुपचूप लग्न; एका मुलाखतीमध्ये केले वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन – Rashmika Mandanna | मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. रश्मिकाने तिच्या कातील अदांमुळे प्रेक्षकांना घायाळ केले आहे. रश्मिकाचा चाहता वर्ग खूप मोठा असून तिच्या लाईफ अपडेट बद्दल जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या अफेअर, रिलेशनशिप आणि लग्नामुळे चर्चेत असते. रश्मिका व अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) या दोघांचे अनेकदा एकत्र फोटो व्हायरल होत असतात. तो आणि रश्मिका अनेकदा एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची (Rashmika And Vijay Affair) कबुली दिलेली नाही. मात्र एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna Marriage) हिने ती विवाहित असल्याचा गौप्यस्फोट केल्याने उपस्थित लोक देखील अवाक झाले.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या लग्नाबद्दल तिच्या चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. तिने नुकतीच एका मुलाखतीला उपस्थिती लावली. यावेळी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलखुलास उत्तरे दिली. रश्मिकाला विचारण्यात आले की ती लग्न कधी करणार आहे ? यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले. या प्रश्नावर अभिनेत्री रश्मिकाने उत्तर दिले की ‘ती आधीपासूनच विवाहित आहे’. तिच्या या उत्तराने चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र नंतर तिने हसून उत्तर दिले की ‘तिने गुपचूप अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर ‘नारुटो’शी लग्न केले आहे’. तिच्या या उत्तराने सर्वत्र हशा पिकला.

अभिनेत्री रश्मिकाने सांगितलेले ‘नारुटो’ हे एक जॅपनीज अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर (Naruto Animated Character) आहे. एका जपानी निनजा अ‍ॅनिमेटेड सिरीज मधील हे पात्र आहे. ‘नरूटो’ व नारुतो शिपूडेन यांचा चाहता वर्ग मोठा असून जगभरातून अनेक लोकांना ही सिरीज आवडते. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे देखील नाव आहे. तसेच रश्मिकाने अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर ‘हिनाटा’ प्रमाणे बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि केसांना जांभळा रंग द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. तिने भावना व्यक्त केल्या असून ती म्हणाली की, ‘नारुटोकडे माझे हृदय आहे. ते माझे सर्वांत आवडते पात्र आहे. मी त्या पात्राशी पूर्णपणे लग्न (Rashmika Mandanna Marriage) केले आहे.” तिच्या या उत्तराने सर्वांना हसायला आले.

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वर्क फ्रॅन्ट बद्दल बोलायचे असेल तर तिच्याकडेही अनेक आगामी मोठे प्रोजेक्टचे काम आहे.
तिचा लवकरच ‘अ‍ॅनिमल’ (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
तसेच ती पुष्पा 2 (Pushpa 2) चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | महाराष्ट्रामध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम ! मे महिन्यात 4 लाख ग्राहकांची भर – ट्राय

Pune Crime News | पुणे : गुन्हे शाखेकडून कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक