Rasika Sunil | रसिका सुनीलने घेतली वाढदिवसानिमित्त आलिशान मर्सिडीज कार; शुभेच्छांचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही नेहमी चर्चेत असते. रसिकाचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या चाहत्यांना तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. रसिकाने नुकताच तिचा वाढदिवस (Rasika Sunil Birthday) साजरा केला. रसिकाने काल (दि.03) तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकावर तिच्या इंडस्ट्रीतील मंडळींनी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. रसिकाने (Rasika Sunil) तिच्या वाढदिवसानिमित्त तिला स्वतःलाच आलिशान गाडी गिफ्ट केली आहे. तिच्या नवीन गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री रसिका सुनील हिच्या वाढदिवसानिमित्त तिने स्वतःला मर्सिडीज कार (Rasika Sunil New Mercedes Car) भेट दिली आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क (Mercedes-Benz Landmark) या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेत्री रसिका सुनील हिचा नवीन कार घेतलेला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने वाढदिवसानिमित्त शोरुम मध्ये जाऊन नवीन कार घेतलेली दिसत आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रसिकानं तिचा वाढदिवस स्टाईलमध्ये साजरा केला आहे. लँडमार्क कार्स तिला आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा देते.” अभिनेत्री रसिका हिने देखील हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे. तिचे सोशल मीडियावर सर्वांनी अभिनंदन केले आहे. लाखो लोकांनी तिच्या या पोस्टला लाईक्स केल्या आहेत.

अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) हिने शोरुममधील काही क्षण आणि कार मध्ये बसल्याचे आनंदी मोव्हमेंट शेअर केल्या आहेत. रसिकाने शोरुम मध्ये केक देखील कट केला आहे. यावेळी तिच्या सोबत तिची फॅमिली देखील दिसत आहे. अभिनेत्री रसिका सुनील हिने आधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर रसिकाने (Rasika Sunil Movies) पोश्टर गर्ल (Poshter Girl), बघतोस काय मुजरा कर (Baghtos Kay Mujra Kar), बस स्टॉप (Bus Stop), गर्लफ्रेंड (Girlfriend) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रसिकाचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या आगामी चित्रपटाची ते नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)