Ratnagiri Flood | दुर्देवी ! चिपळूणच्या कोविड रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू

चिपळूण न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  रत्नागिरी जिल्ह्यात पावासाने हाहाकर माजवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Ratnagiri Flood) कोसळत असल्याने प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती (Ratnagiri Flood) निर्माण झाली आह. रत्नागिरीमध्ये आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयांना (Covid hospital) बसला असून 8 रुग्णांचा मृत्यू (8 patients died) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन (Oxygen) न मिळाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कोविड रुग्णालयाला पुराच्या पाण्याने चारीबाजूंनी वेढलं आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसारन, रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) चिपळूणमध्ये (Chiplun) मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे.
अतिवृष्टीमुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरला चारीबाजूंनी पाण्याने वेढलं आहे.
याच कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

कोविड रुग्णालयाला चारीबाजूंनी पाण्याचा वेढा आहे.
त्यामुळे या रुग्णालयात रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही.
तर रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पावसाची विश्रांती पण पुरस्थिती कायम

रायगड आणि रत्नागिरी परिसरात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे हजारो नागरिक अडकून पडले आहेत. पावसाने सध्या विश्रांती घेतली असून पुराचे पाणी ओसरु लागले आहे.
परंतु अद्याप काही ठिकाणी 3 ते 5 फूट पाणी आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी घटनास्थळावर एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) तसेच नेव्हीचे पथक दाखल झाले असून बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Web Title : ratnagiri flood 8 patients died in covid hospital in chiplun people alleges death due to lack of oxygen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ratnagiri Flood | रत्नागिरीत धो-धो; पूल गेला वाहून

Pune Crime | पुण्यातील 49 वर्षीय महिलेला गोड बोलून त्यानं नेलं लॉजवर, नवीन साडी नेसताना अन् उतरवताना काढले फोटो

Reserve Bank of India | बदललेल्या नियमांमुळे 1 ऑगस्टपासून दैनंदिन व्यवहारांवर होणार परिणाम, जाणून घ्या