Coronavirus : ‘प्रिन्स चार्ल्स’ च्या ‘नमस्ते’ वाल्या व्हिडीओवर अभिनेत्री रवीना टंडनची ‘प्रतिक्रिया’ (व्हिडीओ)

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसनं देशात एन्ट्री केली आहे. 74 लोकांना या व्हायरसची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व लोक सुरक्षा आणि खबरदारी घ्यायला सांगत आहे. अलीकडेच अभिनेत्री रवीना टंडन हिनं प्रिंस चार्ल्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. खरंतर ट्विटरवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला रिट्विट करत तिनं केलेल्या भाष्यामुळं ती चर्चेत आली आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, प्रिंस चार्ल्स गाडीतून उतरल्यानंतर ज्या लोकांना भेटत आहेत त्यांना शेक हँड करू लागतात. परंतु अचानक त्यांना कोरोनाचं आठवतं आणि ते नमस्ते करतात. ABC न्यूजनं हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी नमस्तेला प्रार्थना केल्यासारखे हात केल्याचा उल्लेख केला आहे. हे पाहून रवीनानं हा व्हिडीओ रिट्विट करत ते प्रार्थना केल्यासारखं नसून त्याला नमस्ते म्हणतात असं तिनं सांगितलं आहे. रवीनानं म्हटलं आहे की, “त्याला नमस्ते म्हणतात. थोडा होमवर्क केला तर बरं होईल.” यात तिनं ABC न्यूजला टॅगही केलं आहे.

रवीनानं शेअर केलेल्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी रवीनाचं ट्विट शेअर केलं आहे. काही चाहत्यांनी तिला सपोर्ट करत ट्विटवर कमेंटही केली आहे. हजारो लोकांनी ट्विट शेअर आणि लाईक केलं आहे.

https://twitter.com/dhillon_bharat/status/1238179856371929091