रविना टंडन होणार राष्ट्रीय उद्यानाची राजदूत

 मुंबई : पोलीसनामा 

वनविकास ,वन्यजीव संवर्धनातील रूची असलेली अभिनेत्री रविना टंडन नॅशनल पार्कची अ‍ॅम्बॅसिडर बनणार आहे .
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पार्क अ‍ॅम्बॅसिडर म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन हिने मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडनला दिला होता. त्याचा स्वीकृतीचे पत्र तिने वनमंत्र्यांना पाठवले आहे. वनविकास, वन्यजीव संवर्धनातील रूची असल्याने रविना टंडन वन विभागाच्या विविध कार्यक्रमात सहभागी असते .

[amazon_link asins=’B07FXNRXXR,B00ZF89GJ8,B07F1D267G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7216522-a69d-11e8-8462-a9e2cddb1b43′]

हीच गोष्ट लक्षात घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत होण्याची विनंती तिला केली होती. त्यास रविनाने होकार दिला असून लवकरच ती जंगल संवर्धन, संरक्षणाची व्यापक जनजागृती करताना दिसेल . उद्यान विकासासाठी विविध उपक्रमांच्या आखणीच्या कामात या जनजागृतीची मोलाची मदत होईल असा विश्‍वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.