Ravindra Dhangekar On Pubs In Pune | चला अनाधिकृत पब, बार दाखवतो म्हणत 48 तासांचा अल्टीमेटम; धंगेकर, अंधारे अधिकाऱ्यांवर संतापले (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Pubs In Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता मोठे खुलासे समोर येत आहेत (Kalyani Nagar Accident) . या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) दोन अधिकाऱ्यांना तसेच एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघाताच्या प्रकरणाला घेऊन आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) हे दोघेही चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आज आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात जात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो ? अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती. का त्यांना सोडलं जातंय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.(Ravindra Dhangekar On Pubs In Pune)

तर, पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची यादीच धंगेकरांनी आणली होती. या यादीत प्रत्येकावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता. परंतु धंगेकर आणि अंधारे कारवाई झालीच नसल्यावर ठाम होते.

दरम्यान दोन्ही नेत्यांचे बोलून झाल्यांनतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department Pune) अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करत अनधिकृत पब आणि तत्सम घटकावर कारवाई केल्याचे सांगितले. ते म्हणाले ” हे आरोप पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. प्रमुख म्हणून अशा पद्धतीने कोठे काही होत असेल तर याबाबत मी चौकशी करेन. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून ८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या विभागाचा प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस पुणेकरांसाठी झगडत आहे. तुमचे जे स्वप्न आहे तेच आमचंही स्वप्न आहे. याबाबतीत ८ हजाराच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेलमालकावर कारवाई करण्याबाबत दुप्पट प्रकरणात वाढ झाली आहे. १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २ परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे”, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणावर धंगेकर आणि अंधारे अधिकच भडकले. चला अनाधिकृत पब, बार दाखवतो म्हणत ४८ तासांचा अल्टीमेटम देत उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत, तोपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही, छगन भुजबळ आक्रमक

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार प्रकरणात CP ना फोन केला? अंजली दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार केल्याच्या रागातून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण, एकाला अटक