Ravindra Dhangekar | झोपडपट्टी वासियांचा काँग्रेस पक्ष हाच सच्चा कैवारी ! झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय – रवींद्र धंगेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | ‘गरिबांबद्दल कळवळा असणाऱ्या इंदिरा बाईंच्या काँग्रेस पक्षालाच आम्ही मत देणार कारण इंदिरा बाईंनी गरिब जनतेच्या कल्याणासाठी खूप काही केले.’अशा आशयाची भावना येरवडा परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये सार्वत्रिक दिसून आली आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींचा पगडा गरिबांच्या मनात किती खोलवर रुजला आहे हे पदयात्रेत ठायी ठायी दिसून आले.(Ravindra Dhangekar)

झोपडपट्टी वासियांचा सच्चा कैवारी काँग्रेस पक्षच असून झोपडपट्टी वासियांना सर्व नागरी सुविधा देणे, कॉम्पुटर प्रशिक्षण, महिला बचत गट, युवा बचत गट याद्वारे तसेच झोपडपट्टी वासियांना स्वताच्या मालकीचे हक्काचे घर मिळावे यासाठी वाल्मिकी – आंबेडकर योजना, बी एस यू पी, राजीव गांधी आवास योजना, एस आर ए अशा विविध माध्यमातून झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचवण्यासाठी कॉंग्रेसने सदैव प्रयत्न केले व यशही मिळवले. यापुढेही झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचावणे हेच माझे ध्येय असणार आहे असे रवींद्र धंगेकर यांनी यावेळी सांगितले.

पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे उमेदवार (Congress Candidate) रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रा वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात (Vadgaon Sheri Vidhan Sabha) येरवडा (Yerawada) परिसरात निघाल्या त्यावेळी अनेक वृद्ध स्त्री पुरुष नागरिकांनी इंदिरा गांधींबद्दलच्या आठवणी जागवल्या.

ही पदयात्रा येरवडा परिसरातील सुभानशहा दर्ग्याजवळील श्वेता चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालया पासून सुरु झाली व
संत सेवालाल चौक, गणराज मित्र मंडळ, बिडी कामगार वसाहत, कामराज नगर, वडार वस्ती मार्गे क्रांतिवीर लहूजी वस्ताद
सांस्कृतिक हॉल येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ढोल ताशा, झेंडे, फटाके आणि घोषणा यामुळे वातावरण निवडणुकीमय झाले होते. या पदयात्रे दरम्यान नागरिकांनी अनेक अडचणींचा पाढा धंगेकरांसमोर वाचला.
गेल्या १० वर्षात भाजपचे खासदार या भागात फिरकले नाहीत ही तक्रार सर्वांचीच दिसून आली.
संपूर्ण परिसराच्या दृष्टीने त्या भागातील राजीव गांधी हॉस्पिटल अपुरे पडते त्यासाठी नवीन हॉस्पिटलची निर्मिती व्हावी,
नवीन शाळा निघाव्यात, समान दाबाने पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, बेकारी असे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले.
मी निवडणुकी नंतर खासदार झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे प्रश्न निश्चितच सोडवेन व त्यासाठी
केंद्राकडून भरीव विक्सानिधी देखील आणेन असे धंगेकरांनी आश्वस्त केले या परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण जास्त असून
येथे झोपडपट्टी वासियांचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवेन असे धंगेकर म्हणाले.

या पदयात्रेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, माजी नगरसेवक संजय भोसले, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट,
माजी नगरसेवक अविनाश साळवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका श्वेता चव्हाण,
माजी नगरसेवक सुनिल मलके, विशाल मलके, माजी नगरसेविका संगीता देवकर, विल्सन चंदेवळ,
येरवडा महिला युवा अध्यक्षा ज्योती चंदेवळ आदी प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | ईव्हीएमवर कमळंच नव्हते, पारंपारिक मतदार असलेले आजोबा भडकले, पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावरील प्रकार (Video)

Baramati Lok Sabha | आरोप-प्रत्यारोप, विखारी टीका, आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल, कार्यकर्ते, मतदारांवर कोणता परिणाम होणार, चर्चेला उधाण!

Dattatray Bharne | शिवीगाळ प्रकरणावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण, मी मराठीत बोललो, शिवीगाळ केली नाही, तक्रारीला कायदेशीर…

Baramati Lok Sabha | आमदार दत्तात्रय भरणेंनी केली सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले (Video)