Ravindra Dhangekar | पर्वती मतदार संघात रवींद्र धंगेकरांच्या पदयात्रांना अभूतपूर्व प्रतिसाद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस (Congress Candidate) पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ गेले दोन दिवस पर्वती (Parvati Vidhan Sabha) व कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघांमध्ये (Pune Cantonment Vidhan Sabha) भव्य पदयात्रांनी वातावरण भारून गेले होते. धंगेकर यांनी जीप यात्रा ऐवजी पदयात्रांवर भर देऊन नागरिकांशी थेट संपर्क ठेवला. त्यास नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला.

गुरुवारी सकाळी पर्वती विधानसभा मतदार संघात बिबवेवाडी गावठाण (Bibvewadi Gaothan) येथील सुरु झालेल्या पदयात्रेत कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा सहभाग लाभला होता. गेले काही दिवस नाराज असलेले कॉंग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुलही नाराजी दूर होऊन पदयात्रेत सहभागी झाले होते.

या पदयात्रेत ढोल ताशा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम-आदमी पार्टी यांचे झेंडे पदयात्रेत डौलाने फडकत होते. ठिकठिकाणी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना औक्षण केले जात होते. फटाक्यांचा दणदणाट आणि घोषणांचा जय घोष यामुळे सारे वातावरण भारून गेले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचि सोय केली होती. दुकानदार धंगेकरांना आवर्जून दुकानात बोलून घेत होते. अनेकजण धंगेकरांबरोबर सेल्फी काढत होते. पदयात्रेत महिलांचा सहभगही मोठा होता. सुमारे ५ तासानंतर ही पदयात्रा आनंदनगर झोपडपट्टी येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत प्रदेश सरचिटणीस अॅड अभय छाजेड, माजी उपमहापौर आबा बागुल, मार्केट यार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, माजी नगरसेवक बाळासाहेब ओस्वाल आणि बंडू नलावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्वती अध्यक्ष शशिकांत तापकीर, सचिन पाटणकर, भरत सुराणा, सीमा महाडिक, मृणालिनी वाणी, सुरेश चौधरी, रवी नलावडे, कृष्णा सोनकांबळे, अकबर मणियार, सतीश पवार, हरिदास चव्हाण, अमोल रासकर आदी प्रमुख सहभागी झाले होते.

याच मतदारसंघात झालेली दुसरी पदयात्रा एस. टी. कॉलनी प्लॉट नं. ३९ येथे सुरु झाली. या पदयात्रेत ही कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्याने सहभगी झाले. पर्वती दर्शन येथे जेसीबीतून धंगेकरांवर गुलाब फुलांचा वर्षा केला गेला. तसेच तिरंगी फुगे देखील आकाशात सोडले गेले. जीप पदयात्रा सुमार ४ तासानंतर शनी मारूती मंदिर येथे समाप्त झाली.

यामध्ये ॲड. अभय छाजेड, ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, विकास लांडगे, सुजित लाजुरकर, आनंद बाफना, द.स. पोळेकर, सद्दाम शेख, शब्बीर शेख, मामा परदेशी, सादिक खुरेशी, दीपक ओव्हाळ, पप्पू घोलप, श्याम काळे, श्रीकांत बागल, वासिम शेख, आयाज सय्यद, माधुरी पाटोळे, ताई कसबे, कर्वेताई, प्रियांका नेटके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अशोक हरणावळ, बाळासाहेब भामरे, मनोज वाघोलीकर, रवी आलीमकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत तापकीर, नितीन कदम, सचिन तावरे, फारूक शेख, राजाभाऊ सावंत, राजाभाऊ देशमुख सहभागी झाले होते. लहूजी प्रतिष्ठान, विजय बजरंग तरुण मंडळ, सुर्यमुखी दत्त मंदिर यांनी धंगेकरांचे जोरदार स्वागत केले. माधुरी पाटोळे, कविता कोकाटे, सुनिता हंगे, शिंदेताई, पवारताई, खरसाडे ताई, सानपताई यांनी तिरंगी फुगे सोडून धंगेकरांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. जोशात चाललेली ही पदयात्रा पंचशील चौक येथे समाप्त झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | ‘तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे’, रोहित पवारांची अजित पवारांवर चौफेर टीका