14 डिसेंबरपासून होईल ‘हा’ मोठा बदल, बदलणार पैशासंबंधी नियम, कोट्यवधी ग्राहकांना मिळेल फायदा

नवी दिल्ली : देशभरात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रियल टाइम ग्रोस सेटलमेंट (RTGS) चोवीस तास (24 बाय 7) उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. 14 डिसेंबरपासून तुम्ही आरटीजीएसचा वापर 24 तास करू शकता. सध्या ही सिस्टम केवळ महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सोडून आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

आरबीआयने हे सांगितले
आरटीजीएस प्रणाली चोवीस तास उपलब्ध करण्याबाबत आरबीआयने म्हटले की, हे ठरवण्यात आले आहे की, आरटीजीएस प्रणाली वर्षातील सर्व दिवस चोवीस तास उपलब्ध करण्यात यावी आणि याची सुरूवात 14 डिसेंबर 2020 च्या मध्यरात्री 00:30 वाजता होईल.

आरटीजीएसद्वारे तोबडतोब फंड ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हे मोठ्या ट्रांजक्शनसाठी उपयोगी येते. आरटीजीएसद्वारे 2 लाख रुपयांपेक्षा कमी अमाऊंट ट्रान्सफर होऊ शकत नाही. ती ऑनलाइन आणि बँकेची शाखा दोन्हीच्या माधमातून वापरता येते. यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे फंड ट्रान्सफर शुल्क नाही. परंतु ब्रांचमध्ये आरटीजीएसमधून फंड ट्रान्सफर केल्यास शुल्क द्यावे लागेल.

यापूर्वी मागील वर्षी डिसेंबरमध्ये आरटीजीएस सिस्टम रोज काही तास उपलब्ध करण्यात आली होती. आरबीआयने आपल्या पॉलिसीमध्ये म्हटले की, त्यावेळे पासून सिस्टम योग्यप्रकारे काम करत आहे. केंद्रीय बँकेनुसार, भारतीय आर्थिक बाजारांच्या जागतिक एकत्रिकरणाच्या लक्ष्याला समर्थन देण्यासाठी सुरू असलेल्या कामांना समर्थन देणे, भारताच्या अंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रांना विकसित करण्याचे प्रयत्न आणि स्थानिक कॉर्पोरेट आणि संस्थांसाठी मोठ्या स्तरावर पैशाच्या व्यवहारात लवचिकता उपलब्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.