RBI चा नवीन नियम, आता बँक दररोज तुमच्या खात्यात डिपॉझीट करणार 100 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे अजूनही बँक ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बँकांकडून सातत्याने प्रयत्न करूनही ग्राहकांना काही अडचणीचा सामना करावा लागत आहे. बर्‍याच वेळा ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्याने पैसे अडकून पडतात होतात. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांच्या या समस्या लक्षात घेऊन एक नवीन नियम बनविला आहे. जर आपला ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाला आणि आपल्याला एका दिवसात पैसे परत मिळाले नाहीत तर नियमांबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

असा आहे नवा नियम :
व्यवहार अयशस्वी झाल्यास बऱ्याचदा बँका ग्राहकाच्या खात्यात रक्कम रिफंड करण्यास वेळ लावतात किंवा तक्रार केल्याशिवाय रिफंड करतच नाहीत. यावर RBI ने रामबाण उपाय काढला आहे. आरबीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर एका दिवसात ग्राहकांना पैसे परत न मिळाल्यास बँका आणि डिजिटल वॉलेट्सला ग्राहकांना दिवसाला १०० रुपये दंड भरावा लागेल. हा नियम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), इंटरमिडिएट पेमेंट सिस्टम (IMPS), ई-वॉलेट्स, कार्ड-टू-कार्ड पेमेंट्स आणि नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊस (NAC) वर लागू होईल.

केवळ डिजिटलच नाही तर डिजिटल नसलेल्या व्यवहारांसाठी सुद्धा मध्यवर्ती बँके (RBI) टाइमलाइन निश्चित केली आहे. ऑनलाईन पेमेंट्स, एटीएम आणि मायक्रो एटीएममधील अयशस्वी व्यवहारासाठी खात्यात प्रवेश रिफंड करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आरबीआयच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर ग्राहकांच्या खात्यावर पोहोचली पाहिजे आणि त्यांची तक्रार दाखल होण्याची प्रतीक्षा बँकेने करू नये.

Visit :- policenama.com

 

You might also like