RBI | Fact Check ! भारतीय रिझर्व्ह बँकेने गुगल पे केले बॅन? जाणून घ्या वायरल मेसेजची सत्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  RBI News | नुकतेच ट्विटरवर काही ट्विट वायरल झाले होते, ज्यामध्ये म्हटले होते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुगल पे बॅन (Banned Google Pay) केले आहे. सोशल मीडियावर ट्विट्स वायरल झाल्यानंतर या गोष्टीचा गांभिर्याने तपास करण्यात आला.

पेमेंट सिस्टम ऑपरेटरच्या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने गुगल पे (Google Pay) बॅन केलेले नाही. ही केवळ अफवा आहे. गुगल पे (Google Pay) द्वारे करण्यात येत असलेले सर्व पेमेंट सुरक्षित आहेत आणि आरबीआयच्या देखरेखीत केले जात आहेत.

एनपीसीआयने दिली माहिती

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने हे स्पष्ट केले आहे की, भारतात गुगल पेवर बॅन नाही. एनपीसीआय भारतात डिजिटल पेमेंट्स संचालित करते आणि युनिफाईड पेमेंटेस इंटरफेस (युपीआय) विकसित करण्याचे काम करते. युपीआयचा वापर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे पेमेंटसाठी केला जातो.

ट्विटरवर सुरू होता ट्रेंड

नुकताच सोशल मीडियावर एक ट्रेंड #GPayBannedByRBI (रिझर्व्ह बँकेद्वारे गूगल पे वर प्रतिबंध) सुरू होता.
यानंतर एनपीसीआयने ताबडतोब स्पष्ट केले की, पेमेंट्ससाठी गुगल पे सुरक्षित आणि अधिकृत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्सने ट्विटरवर मीम सुद्धा शेयर केले होते.
परंतु ही अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

 

Web Title : RBI | Fact Check ! reserve bank of india has not banned google pay know what is the truth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पेट्रोल, डिझेल दरवाढीची झळ महापालिकेलाही; टाटा निक्सॉन कंपनीच्या पर्यावरणपूरक 38 ई मोटारी भाडेतत्वावर घेणार

Latur News | लातूर-औसा महामार्गावर भीषण अपघातात पती-पत्नी ठार, तर मुलगी गंभीर जखमी

Solapur News | जेऊरच्या रवीकिरणची नेदरलँडला निवड; आर्थिक मदतीसाठी केलं ‘हे’ आवाहन