RBI Job Notification 2023 | आरबीआयमध्ये काम करण्याची पदवीधर तरुणांना सुवर्णसंधी; जाणून घ्या अटी

पोलीसनामा ऑनलाइन – RBI Job Notification 2023 | देशाची मध्यवर्ती व महत्त्वाची बॅंक असणाऱ्या रिजर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India (RBI) काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पदवीधारक कोणत्याही व्यक्तीला आरबीआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांच्या 450 जागांसाठी भरती (RBI Job Notification 2023) जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर www.rbi.org याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरबीआय बँकेमध्ये काम करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून परिक्षेच्या उर्वरित माहिती देखील वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आरबीआयमध्ये सहाय्यक पदासाठी (RBI Assistant Vacancy) नोकरी भरती जाहीर झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरु करण्यात आली आहे. हा अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 ही आहे. आजपासून प्रक्रिया सुरु झाली असून 4 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहे. तसेच या भरतीसाठी 3 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 21 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान इच्छुक उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. आरबीआयची सहाय्यक पदासाठीची ही मुख्य परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी होईल. त्याचबरोबर, मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी देखील द्यावी लागणार आहे. पूर्व परीक्षा, भाषा प्राविण्य परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीच्या तीन परीक्षा द्याव्या लागणार आहे. (RBI Job Notification 2023)

आरबीआयमध्ये असणाऱ्या सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्जदारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची
50 टक्के गुणांसह बॅचलर पदवी असणे अनिवार्य आहे. जे इच्छुक हे ओबीसी (OBC), एससी (SC) आणि एसटी (ST)
यामध्ये येत असतील त्यांना पदवी 50 टक्के गुणांची अट नाही. फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराला कम्प्युटरची बेसिक माहिती व वर्ड प्रोसेसिंगचं ज्ञान आवश्यक आहे.
आरबीआयमध्ये या सहाय्यक पदासाठी 450 जागा निघाल्या असल्याने लवकरात लवकर पदवीधर इच्छुकांनी अर्ज करावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”