CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Viral Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले असून विरोधक देखील हा व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका करत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. (CM Eknath Shinde On Viral Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणविषयक (Maratha Reservation) सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. (CM Eknath Shinde On Viral Video)

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात नेमका काय संवाद झाला ऐकायला मिळत आहे.
मुख्यमंत्री म्हणतात – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार म्हणतात – हो… येस
देवेंद्र फडणवीस म्हणतात – माईक चालू आहे.

https://x.com/mieknathshinde/status/1701879243851063395?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLA Disqualification Notice | सुनावणीवेळी हजर राहा! ‘या’ ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस

Privatization of Government Schools | कंत्राटी भरती पाठोपाठ सरकारी शाळांचे देखील खाजगीकरण;
उद्योग समूहांना सरकारी शाळा देणार दत्तक