RBI Rules | चेक देण्यापूर्वी करू नका ही चूक, अन्यथा भरावा लागेल दंड! जाणून घ्या RBI चे नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  RBI Rules | जर तुम्ही चेकद्वारे पेमेंट करत असाल तर पहिल्यापेक्षा जास्त सतर्क राहावे लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI Rules) बँकिंग नियमात काही बदल केले आहेत. केंद्रीय बँकेने आता 24 तास बल्क क्लियरिंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेकने पेमेंट करण्याच्या पद्धतीवर पडणार आहे. म्हणजे, आता चेक क्लीयर होण्यास 2 दिवस लागणार नाही.

आता चेक टाकताच त्याची रक्कम क्लीयर होईल.
अशावेळी चेक जारी करताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि चेक जारी करण्यापूर्वी हे पहावे लागेल की खात्यात पैसे आहेत किंवा नाही.

7 ही दिवस क्लीयर होतील चेक –

आता चेक NACH सर्व सातही दिवस उपलब्ध होईल. यासाठी तुम्हाला चेकच्या माध्यमातून पेमेंट करताना सावधगिरी बाळगावी लागेल.
आता ते नॉन वर्किंग डे म्हणजे साप्ताहिक सुट्टी आणि नॅशनल हॉलिडेला सुद्धा काम करतील.
यासाठी आता चेक जारी करताना खात्यातील पैसे तपासून घ्या. अन्यथा चेक बाऊंस होईल.
चेक बाऊंस झाल्यास खात्यातून पेनल्टी भरावी लागेल.

जाणून घ्या काय आहे NACH –

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित NACH द्वारे बल्क पेमेंटचे काम केले जाते.
हे एकाच वेळी अनेक क्रेडिट ट्रान्सफरची सुविधा देते.
याशिवाय बल्क पेमेंट जसे सॅलरी, पेंशन, व्याज, डिव्हिडंट इत्यादीचे पेमेंट होते.
हे इलेक्ट्रिसिटी, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचा हप्ता, गुतवणूक, इन्श्युरन्स प्रीमियम इत्यादी पेमेंटचे काम सुद्धा करते.

 

हाय व्हॅल्यू चेक पेमेंटसाठी आता होतील हे नियम –

आरबीआयने जानेवारीत पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली होती जेणेकरून चेक आधारित ट्रांजक्शन पहिल्यापेक्षा सुरक्षित करता यावे.
पॉझिटिव्ह पे सिस्टममध्ये 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या चेक पेमेंटसाठी डिटेल्स दुसर्‍यांदा चेक केल्या जातात.

दुसर्‍यांदा चेक होतील सर्व डिटेल्स –

या प्रक्रियेंतर्गत चेक जारीकर्ता इलेक्ट्रॉनिक प्रकारे क्लियरिंगसाठी दिलेल्या चेकबाबत माहिती देतो.
जसे की चेक नंबर, चेकची तारीख, पेमेंट करणार्‍याचे नाव, अकाऊंट नंबर, रक्कम आणि इतर माहिती. जारीकर्त्याला अगोदर जारी केलेल्या चेकची डिटेल सुद्धा येते.

 

Web Title : RBI Rules | do not do this mistake before deducting the check otherwise you will have to pay a fine know the new rules of rbi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI Rules | जर तुमच्या फोनवर येत नसेल OTP तर तात्काळ करा ‘हे’ काम, अशी करता येईल तक्रार; जाणून घ्या

Mumbai Unlock | मुंबईकरांना आणखी दिलासा ! आजपासून मैदाने, उद्याने, चौपाट्या मुंबईकरांसाठी खुले, BMC चा निर्णय

PM Modi | ‘या’ 6 सरकारी योजनांवर PM मोदींची ‘नजर’, 2024 च्या अगोदर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे ‘लक्ष्य’