31 डिसेंबपूर्वी ‘हे’ काम नाही केले तर तुमचे ‘ATM’ होऊ शकते ‘बंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातल्या कोणत्याही बँकेत बचत खातं असेल तर 31 डिसेंबर 2019 पर्यंत  EVM असलेले डेबिट कार्ड बॅंक मधून घ्यावे लागेल. आरबीआयच्या नियमांनुसार मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या कार्डऐवजी ईव्हीएम चिप कार्ड घेणे गरजेचे आहे. ज्या खातेधारकांनी हे केलेले नाही त्यांची खाती बंद करण्यात आली आहेत. 15.5 लाख खाती बंद करण्यात आली असून आता ही कार्ड वापरता येणार नाही.

ईव्हीएम चिप लावलेली कार्डस् सुरक्षित असल्यामुळे त्यांचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल 2019 मध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ड देण्यात आल्यानंतर सरकारी आणि खासगी बँकांनी ईव्हीएम कार्ड ब्ल़ॉक केले होते. त्यामुळे न चालणारी खाती बंद झाली.

तुम्ही जर मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट कार्ड बदललं नसेल तर आणखी एक संधी आहे. तुम्ही तुमच्या होम ब्रँचमध्ये जाऊन कार्ड बदलून घेऊ शकता. 31 डिसेंबर 2019 पर्यंत तुम्ही कार्ड बदलून घेतले नाही तर तुमचे डेबिट कार्ड बंद होईल.

मागच्या दोन वर्षात डेबिट कार्डच्या संख्येत लक्षणीय घट झाली. ऑक्टोबर 2018 मध्ये डेबिट कार्डची संख्या 99.8 होती. हीच संख्या अब्जापर्यंत जाईल असा अंदाज होता. मात्र, एक वर्षात ही संख्या 15 टक्क्यांनी घटली असून ऑक्टोबर 2019 मध्ये ही संख्या 84.3 लाखांवर आली आहे. याचे कारण मॅग्नेटिक स्टिप कार्डचे EVM चिप असलेल्या कार्डमध्ये झालेले रुपांतर.

जन-धन योजनेमुळे ग्रामीण भागात डेबिट कार्डचा वापर वाढला आहे. जन-धन योजनेत खातेधारक वापरत असलेले रुपे कार्ड मागच्या वर्षीच्या तुलनेत 2019 मध्ये 29.68 लाखांवर पोहचले. याच योजनेमुळे देशातल्या गरीब कुटुंबामध्येही डेबिट कार्डचा वापर 75 टक्क्यावरून 80 टक्क्यांवर पोहचला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/