वर्षा संजय राऊत यांना ED ची नोटीस, मंत्री आदित्य ठाकरेंची महत्वाची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम असून महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करत असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Environment Minister and Shiv Sena youth leader Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. यावरून राजकीय टीका- टीप्पणीला वेग आला आहे. महाविकास आघाडी व भाजप नेते आमने- सामने आले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. मंगळवारी (दि. 29) चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावले आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी 55 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वर्षा राऊत यांच्यावर आहे. दरम्यान संजय राऊत यांनी राज्यसभेच्या शपथ पत्रात 55 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. हे पैसे कशासाठी घेतलेत याबाबत ED ला माहिती हवी आहे.