कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर घर ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा सॅनिटाइज; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनातून बरे झाल्यानंतर घर सॅनिटाइज sanitize आणि डिसइन्फेक्ट करणे खुप आवश्यक आहे. जर घर योग्य प्रकारे स्वच्छ केले नाही तर यातून पुन्हा संसर्ग पसरण्याचा धोका असू शकतो. कोविड-19 मधून रिकव्हर झाल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता कशाप्रकारे करावी याबाबत जाणून घेवूयात…

‘व्हिटॅमिन -डी’ च्या कमतरतेने शरीरात होऊ शकतात ‘हे’ 4 आजार; जाणून घ्या 3 उपाय

1 ग्लव्हज घालून स्वच्छता करा
घर सॅनिटाइज sanitize करण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करा. तत्पूर्वी ग्लव्हज आणि मास्क घाला. प्रत्येक खोलीची स्वच्छता करा. झाडू मारा, लादी पुसून घ्या. फॅन सुरू करा, खिडक्या उघडा.

2 अशी करा जमीनीची स्वच्छता
फ्लोअरच्या स्वच्छतेसाठी एका बादलीत गरम पाण्यासह साबणाचे पाणी मिसळा. दुसर्‍या बादली साधे पाणी घ्या. तिसर्‍या बादलीत फ्लोअर डिसइन्फेक्टेंट मिसळलेले पाणी घ्या. आता खोली साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर साध्या पाण्याने क्लीन करा आणि शेवटी फ्लोअर डिसइन्फेक्टेंटच्या पाण्याने पुसून घ्या. नंतर मॉप गरम पाणी आणि नॉर्मल डिसइन्फेक्टने क्लीन करून उन्हात सुखवा.

3 सामानाची अशी करा स्वच्छता
खोलीत ठेवलेले टेबल-चेयर, दरवाजा, खिडकी, स्विच इत्यादी सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. यासाठी डस्टर गरम पाण्यात आणि डिटर्जंटमध्ये ओला करा आणि पृष्ठ भाग पुसून घ्या. नंतर सॅनिटायजर स्प्रे करा.

4 गॅझेट्सची स्वच्छता आवश्यक
कोविड रिकव्हरी नंतर लॅपटॉप, टीव्ही, मोबाइलसारखी गॅझेट्स स्वच्छ करा.
यासाठी कॉमन डिसइन्फेक्टेंटचा वापर करा, ज्यामध्ये अल्कोहलची मात्रा जास्त असावी.
मात्र, लिक्विड डिसइन्फेक्टेंट आत जाणार नाही याची काळजी घ्या.
नॉर्मल डिसइन्फेक्टेंट आणि डस्टरच्या मदतीने कम्प्यूटर, कीबोर्ड, माऊस, टीव्ही, रिमोट, मोबाइल आणि फ्रिजचा दरवाजा स्वच्छ करा.

5 या वस्तू सुद्धा करा स्वच्छ
खोलीतील पडदे, बेडशीट्स, पिलो कव्हर चांगले धुवून घ्या.
खिडक्या आणि दरवाजे साबणाच्या पाण्याने धुवा.
नंतर सोडियम हायपोक्लोराईट मिक्स करून ते डस्टरने पुसून घ्या.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले