खुशखबर ! आगामी ६ महिन्यात नोकर्‍यांचा ‘वर्षाव’, ३-५ वर्षांचा अनुभव असणार्‍यांना ‘प्राधान्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे ३ – ५ वर्षांचा नोकरीचा अनुभव असेल तर येणाऱ्या ६ महिन्यात नोकऱ्यांची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशातील कंपन्या या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत नव्या नियुक्त्या करण्याच्या तयारीत आहेत आणि ३-५ वर्षांच्या नोकरीचा अनुभव असणाऱ्यांची कंपन्याकडून मोठी मागणी असणार आहे.

जॉबची महिती देणाऱ्या नोकरी डॉट कॉम ने केलेल्या सहामाही सर्वेक्षणात नोकरी हायरिंग आऊटलूक जुलै डिसेंबर २०१९ मध्ये सांगितले आहे की, या सर्वेक्षणात सहभागी ७८ टक्के कंपन्या येणाऱ्या सहा महिन्यात हायरिंग अ‍ॅक्टिव्हिटी वाढवणार आहे. मागील वर्षी हा आकडा ७० टक्के होता.

असे असले तरी रोजगाराची संधी निर्माण होत आहे हे चांगले संकेत आहेत. परंतू कंपन्यांना उत्तमातील उत्तम उमेदवार शोधण्यात अडचणी येत आहे. सर्वेक्षणात स्पष्ट झाले की येणाऱ्या काळात हुशारीची तंगी येणार आहे. या वर्षी देखील ही शक्यता ४१ टक्के असणार असे सांगितले जात आहे, तर मागील वर्षी हा अंदाज ५० टक्के होता.

या सर्वेक्षणानुसार, १६ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की पुढील ६ महिन्यात फक्त रिप्लेसमेंट हायरिंग होणार आहे. तर ५ टक्के जणांनी सांगितले की, हायरिंगमध्ये वाढ होणार नाही. आयटी, बीएफएसआय आणि बीपीओच्या जवळपास ८०-८५ टक्के कंपन्यांनी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत.

सर्वेक्षणानुसार, सर्वात जास्त हायरिंग ३-५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांची आहे. यानंतर १-३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना संधी मिळेल. तर एकूण हायरिंगच्या १८ टक्के हायरिंगमध्ये ८ वर्षांपर्यंतचा अनुभव असणाऱ्यांना संधी मिळेल. बीपीओ कंपन्या आपल्या एकूण हायरिंगमध्ये ५० टक्के जागा ०-१ वर्ष अनुभव असणाऱ्यांना देणार आहे. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री १२ वर्षापेक्षा आधिक अनुभव असणाऱ्यांना संधी देणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त