पुणे मनपा हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात येणार्‍या मेट्रो पुलामध्ये बाधीत होणार्‍या झोपडीधारकांचे पुर्नवसन करावे : नगरसेविका राजश्री काळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुलाची वाडी मेट्रो पुल व पुणे शहरातील विविध मेट्रो पुलांखाली व बाजूच्या परिसरात राहणा-या झोपडपट्टीधारकांची घरे ही नव्याने बांधण्यात येणा-या पुलांमुळे बाधित होत आहेत. यामुळे सदरील झोपडपट्टीधारक बेघर होणार आहेत. तरी पुणे मनपा हद्दीमधील मेट्रो पुलाच्या कामामध्ये बाधित होणा-या झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन पुणे मनपामार्फत करण्यात यावे. अशी मागणी भाजपा च्या नगरसेविका राजश्री काळे यांनी केली आहे.

पुलाची वाडी येथील 500 घरांची लिस्ट राजश्री काळे यांच्या कडे आहे. हे लोक मागील 20-25 वर्ष पुलाची वाडी येथे रहात आहेत. हे सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. तरी त्यांच्या बाजूने विचार करण्यात यावा असे काळे यांनी सांगितले.

या विषयी नगरसेविका काळे यांनी आयुक्ता ना पत्र दिले असुन आयुक्तांन द्वारे लवकरच पुर्नवसन करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती नगरसेविका काळे यांनी दिली. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही यावेळी काळे यांनी दिला.