खोटी तक्रार करणे प्रेयसीला पडले महागात, खटला रद्द

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – पाच वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर घरच्यांनी त्यांचा विवाह करुन देण्याचे निश्चित केले. परंतु, पुढे लग्न मोडले. त्यामुळे तरुणावर व त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेला विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे.

एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतलेली तक्रारदार युवती आणि जयेंद्र आयरे हे फेसबुक फ्रेंड झाले आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. आरोपीने आपल्याला आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मेसेज पाठवल्याचे तिचे म्हणणे होते. डिसेंबर २०१५ मध्ये दोघांचे कुटुंबिय भेटले आणि त्यांनी दोघांचा विवाह करण्याचे ठरवल्याचे तिने म्हटले होते. मात्र एप्रिल २०१६ मध्ये विवाह मोडल्यानंतर युवतीने आयरे आणि त्याच्या कुटुंबियांविरूद्ध तक्रार दाखल केली. वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्दबातल करण्यात यावा, यासाठी आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरोपीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
दोघांचे पाच वर्षे प्रेमसंबंध होते. ते तुटल्यानंतर विनयभंगाचे आरोप करणे उचित नाही. साखरपुड्यासाठी खर्च केलेली रक्कम त्यांना परत करण्यास तयार असल्याचे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी मांडले. सूड घेण्यासाठी केले जाणारे आरोप अशा निर्णयामुळे थांबतील, असे तरुणाच्या वकिलांनी सांगितले.

…म्हणून त्या महिलेने केली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची धुलाई