फक्त 1 रुपया जास्त द्या अन् वाढवा 28 दिवसांची व्हॅलिडिटी; Jio ची खास ऑफर

नवी दिल्ली : देशात अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. सर्वच नेटवर्क कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्लॅन्स आणले जातात. अशाचप्रकारच्या ऑफर्स रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडून आणण्यात आली. त्यानंतर आता Jio ने ज्यामध्ये फक्त 1 रुपया जास्त देऊन 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 56 GB अधिक डेटा मिळवता येतो.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडून आपल्या युजर्ससाठी अनेक ऑफर्स आणण्यात येत असतात. त्यानंतर आता जिओने युजर्ससाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स् आणले आहेत. ज्यामध्ये युजर्स आपल्या गरजेनुसार, आवडीचा प्लॅन घेऊ शकतात. फक्त 1 रुपयाचा फरक असणाऱ्या या प्लॅनमध्ये डाटा आणि व्हॅलिडिटीचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. तर 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आहे.

काय आहे 598 च्या प्लॅनमध्ये?

रिलायन्स जिओच्या 598 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. याची वैधता 56 दिवसांची असते. संपूर्ण प्लॅनमध्ये 112 GB हाय स्पीड डेटा मिळतो. पण, डाटा लिमिट संपल्यानंतर, याचा स्पीड कमी होऊन 64kbps होतो. या प्लॅनसह फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्ये कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय एक वर्षासाठी डिज्नी हॉटस्टार सब्सक्रिप्शनही फ्रीमध्ये मिळते.

काय आहे 599 च्या प्लॅनमध्ये?

जिओचे 599 रुपयांचे रिचार्ज केल्यास या प्लॅनमध्येही दररोज 2GB डेटा मिळणार आहे. यात एकूण 168 GB डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.