Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans | एअरटेल, जिओचे 300 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह SMS सुविधाही उपलब्ध; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans | भारतातील टेलिकाॅम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर प्लॅन्स आणत असते. त्यामुळे अनेक ग्राहकांचे स्वस्त आणि फायदेशीर प्लॅन्सकडे लक्ष लागले असते. अनेक रिचार्ज प्लॅन्स असतात त्यामध्ये मोबाईल डेटा आणि फ्री काॅल्स उपलब्ध असतात. तर असाच काही प्लॅन्स समोर आले आहेत. एअरटेल (Airtel) आणि जिओचे (Jio) 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन्स (Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans) उपलब्ध झाले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

एअरटेलचे प्लॅन्स –

एअरटेलने (Airtel) ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स आणले आहेत. Airtel 300 रुपयांपेक्षा कमी ऑफरमध्ये 209, 239 आणि 265 रुपयांचे प्लॅन्स देत आहे. त्यात दररोज 1 GB डेटा मिळणार आहे. या सर्व प्लॅनची वैधता कालावधी वेगळा आहे. 209 रुपयांच्या प्लॅनची वैधता 21 दिवस, 239 रुपयांच्या प्लॅनची वैधता 24 दिवस आणि 265 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. (Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans)

Airtel कॅलेंडर योजना –

एअरटेलने (Airtel) अलीकडेच कॅलेंडर प्लॅन तयार (Calendar Plan) केला आहे, ज्याची किंमत 296 रुपये आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये Unlimited Calls, दररोज 100 SMS आणि एकूण 25GB डेटा उपलब्ध आहे. एकदा डेटा संपल्यानंतर, युझर्सना प्रत्येक MB साठी 50 पैसे द्यावे लागणार आहे.

रिलायन्स जिओ प्लॅन –

हा 259 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. जिओच्या 259 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. रोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत खाली येतो. डेली डेटा बेनिफिटसह रिलायन्स जिओतर्फे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Unlimited Voice Calling) आणि दररोज 100 SMS ऑफर केले जातात.

239 रुपयांचा प्लॅन –

रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा प्लॅनही 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.
जिओच्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो.
डेली डेटा बेनिफिटसोबत, रिलायन्स जिओ अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
(Unlimited Voice Calling) आणि दररोज 100 SMS ऑफर केले जातात.
या प्लॅनमध्ये Jio Movie, Jio Cloud यांसारख्या अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.

Web Title :- Reliance Jio – Airtel Prepaid Recharge Plans | reliance jio airtel less than
rupees 300 plan which gives free calling and sms

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा