Jio ची खास ऑफर ! 399 रुपयांचा रिचार्ज आता केवळ 299 रुपयांत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने आता एक वापरकर्त्यांसाठी खास ऑफरची मस्त बातमी दिली आहे. तर ३९९ रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करणाऱ्यांना १०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे ३९९ रुपयांचा रिचार्ज वापरकर्त्यांना केवळ २९९ रुपयांत पडणार आहे. हि एक जिओची खास ऑफर आहे. तर या ऑफरचा फायदा एका ग्राहकांना एकाचवेळी घेता येणार आहे. या खास ऑफर बाबत जाणून घ्या.

कॅशबॅक कसा मिळेल?

रिलायन्स जिओची अधिकृत वेबसाइट Jio.com वर सगळ्यात खाली स्क्रॉल केल्यानंतर पार्टनर ऑफर्स लिहिलेले असेल त्यावर क्लीक करणे, नंतर युजर्सना सर्वात वर Jio लिहिलेले दिसेल. याच्या खाली Brand Partner, Retail Partner आणि Recharge Partner लिहिलेले आहे. तर युजर्सना रिचार्ज पार्टनरवर जाऊन या ठिकाणी युजर्सना वेगवेगळ्या ऑफर्स दिसतील. यामध्ये एक Mobikwik Recharge Offer आहे.

तसेच या वेबसाइट शिवाय, MyJio App च्या होमपेज वर खाली स्क्रॉल केल्यानंतर Recharge offer section मध्ये युजर्सना अनेक वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत. Jio च्या अधिकृत वेबसाइट आणि MyJio App वर यादी करण्यात आलेल्या ऑफर वरून जर कोणताही युजर ३९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा रिचार्च करीत असेल तर त्याला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. कॅशबॅकचा लाभ मिळाल्यानंतर ३९९ रुपयांचे रिचार्ज युजर्सना २९९ रुपयांत पडेल. MyJio App किंवा Jio.com वर रिचार्ज करताना मोबिक्विकद्वारे पेमेंट करावे लागेल.