खुशखबर ! प्रत्येक ‘ब्रॉडबँड’ कनेक्शनबरोबर ‘Jio’ देणार सेट टॉप बॉक्स एकदम ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओच्या प्रत्येक ब्रॉडबॅंड कनेक्शनवर एक सेट टॉप बॉक्स मोफत देणार आहे. DTH आणि केबल टीव्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio ने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्सची ऑप्टिकल फायबर आधारित सेवा जिओ 5 सप्टेंबरपासून सुरु करेल.

सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल –
याचा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने ग्राहकांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. आता तुम्ही घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करु शकतात. यासाठी सेट टॉप बॉक्सला गिगा फायबर नेटवर्कने जोडावे लागेल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे. या संबंबधित माहिती देताना कंपनीने आपल्या एजीएममध्ये उपलब्ध करुन देत असलेल्या सुविधांची माहिती दिली आहे.

जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याचे प्लॅन १०० Mbps पासून सुरु होतील. हा स्पीड बेसिक प्लॅनसाठी असेल. प्लॅननुसार हा स्पीड १ Gbps जाईल. यात सर्व वाइस कॉल फ्री असणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होईल. अनलिमि़डेट इंटरनॅशनल कॉलिंगचा प्लॅन ५०० रुपयांपासून सुरु होईल. तसेच वार्षिक प्लॅन घेणाऱ्यांना जिओ सेट टॉप बॉक्स मोफत देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –